इतिहासकार वी. सी. बेंद्रे यांच्या दाव्याचे खंडन
‘‘तुकोबा एकटेच भजनात दंग असत… टाळ, वीणा, टाळकरी वगैरेंच्या साहाय्याशिवाय तिन्हीत्रिकाळ भजन करत… १४ टाळकऱ्यांचे शुक्लकाष्ठ तुकारामांच्या मागे लावले आहे. ते बरेच निराधार आहे.’’ इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या ‘तुकाराम महाराज यांचे संतसांगाती’ या पुस्तकात अशा प्रकारचे लिखाण केले. या लिखाणाचे पुरावे देत डॉ. सदानंद मोरे यांनी खंडण केले. त्या अनुषंगाने त्यांची घेतलेली ही मुलाखत…