माऊलींसोबत पंढरीला जाण्यासाठी

हजारो वारकरी अलंकापुरीत दाखल

आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबत विठुरायाला भेटायला जाण्यासाठी आतुर झालेले हजारो वारकरी अलंकापुरीत दाखल झाले आहेत. आज (दि. ११) सायंकाळी ४ वाजता आळंदीतील मंदिरातून पंढरीच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली आहे.
adidas yeezy shoes
adidas yeezy 350 boost v2 oreo
adidas originals store
adidas yeezy sneakers
adidas online store
adidas yeezy foam runner onyx
adidas yeezy boost
adidas yeezy 350 boost
adidas yeezy slide stores
adidas shoes on sale
adidas coupon code
adidas shoes on sale
adidas online
adidas yeezy boost 350 v2 mens
womens adidas ultra boost
adidas sale
adidas slides yeezy
adidas shoes
adidas yeezy 450
adidas yeezys
adidas yeezy womens
adidas ultra boost sale
adidas yeezy foam runner
adidas yezzy boost 350 v2
adidas shoe sales
adidas originals store
adidas store
adidas yeezy boost
adidas ultraboost 20 sneakers stores
adidas yeezy womens
best adidas shoes
adidas yeezy boost 350
adidas yeezy 350 boost v2
adidas yeezy boost 350 v2 shoes stores
adidas yeezy
adidas yeezy 350 boost v2
adidas yeezy foam
adidas yeezy boost 350 v2
adidas shoes for men
adidas stores
adidas ultraboost shoes

रविवारी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर रात्री माऊलींची पालखी आळंदीतीलच गांधीवाडा या आजोळघरी मुक्कामी असेल. सोमवारी (दि. १२) भल्या सकाळी पालखी सोहळ्याची पुणे मुक्कामाकडे वाटचाल सुरू होईल.

अंकली (जि. बेळगाव) येथून सरदार शितोळे यांच्याकडून निघालेले माऊलींचे मानाचे अश्व आळंदी मुक्कामी पोहोचले आहेत. माऊलींच्या रथाला नवी झळाळी देण्यात आली आहे. दोन दिवसांपासूनच अलंकापुरीत आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गजबज सुरू झाली आहे. इंद्रायणीचे दोन्ही काठ भाविकांच्या मांदियाळीने फुलून गेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी आळंदीकडे येत आहेत.

राज्य परिवहन मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी जादा फेऱ्या करण्यात येत आहेत. आषाढी वारीचे मानकरी, सेवेकरी, वीणेकरी, टाळकरी यांचे आगमन अलंकापुरीत झाले आहे. आषाढी वारीसाठी प्रस्थान सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांप्रमाणेच नागरिकांचीही गर्दी जमू लागली आहे. आळंदीमधील तुळशी, हार, फुले, मृदुंग, वीणा, टाळ, पेटी, ग्रंथ आदींची दुकाने सजली आहेत.

प्रशासन झाले सज्ज
प्रशासनाच्या वतीने आळंदीमध्ये विविध यंत्रणा सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. महावितरण, पाणीपुरवठा विभाग, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभागाची विविध पथके कार्यान्वित झाली आहेत. यंदा मोठ्या संख्येने फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने शहरात पाच ठिकाणी टँकर भरण्याची व्यवस्था केली आहे. या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा कर्मचारी २४ तास असणार आहेत. वारी काळात एकूण २२ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जलशुद्धीकण केंद्राची स्वच्छता, मोटारींची दुरुस्ती करण्यात आली आहे. शहरात लावलेल्या शौचालयांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र पाईप लाईन टाकून काम करून घेण्यात आले आहे.

वीज पुरवठ्याची तयारी
शहरातील मंदिर आणि इंद्रायणी घाट परिसरातील तसेच इतर महत्त्वाच्या सर्व ठिकाणचे एकूण १७ हायमास्ट दिवे सुरू केले गेले आहेत. शहरातील मोबाईल टॉयलेटसना विद्युत व्यवस्था करून देण्यात आली आहे. रस्त्यावरील दिवाबत्तीची दुरुस्ती करून रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी पुरवठा केंद्राच्या ठिकाणी २५० के. व्ही. ए क्षमतेच्या जनरेटरची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात आली आहे.

स्वच्छतेसाठी सज्जता
गर्दीच्या अनुषंगाने शहरात निर्माण होणारा घनकचरा, रस्ते साफसफाई, औषध फवारणी, धूर फवारणी आदी कामे तीन शिफ्टमध्ये करण्यात येणार आहेत. नगरपरिषदेच्या १२ घंटागाड्या, ३ कॉम्पाक्टर, ५ टॅक्टर, सक्शन मशीन इत्यादी वाहनांसह साधारण १०० सफाई कर्मचारी २४ तास तैनात असणार आहेत. वारी संपल्यानंतरच्या स्वच्छतेबाबतचेही नियोजन करण्यात आले आहे. शहरातील नगरपरिषद मालकीची सर्व सार्वजनिक शौचालये एकूण ३५६ सिट्स, सुलभ शौचालयाच्या एकूण ४९० सिट्ससह, १५०० मोबाईल टॉयलेट्स भाविकांना वापरण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच ते वापरण्या योग्य राहतील यासाठी पालिकेने तयारी केली आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त
आळंदी शहरात आवश्यक त्या सर्व ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर आणि सर्व महत्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण पालिकेमार्फत काढून घेतली आहेत. वारीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून आळंदीतील प्रमुख चौक तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र, टेहळणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यावर्षी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून ३ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलिस निरीक्षक, १६० उपनिरीक्षक, १८२२ अंमलदार, ३३९ वाहतूक अंमलदार, १ हजार होमगार्ड नेमण्यात आले आहेत. तसेच एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एनडीआरएफच्या ४ तुकड्या, बीडीडीएसचे ४ पथक, चोरी नियंत्रण १२ पथके, छेडछाडची २ पथके आणि दामिनी ४ पथके मदतीला पाचारण करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात ३४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर पालिकेनेही १३० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३ मोठ्या स्क्रीन बसविल्या आहेत. चोरीच्या घटना रोखण्यात आणि तपासात त्यांची मोठी मदत होणार आहे.

आरोग्य यंत्रणा सुसज्ज
आळंदीत भाविकांच्या सेवेसाठी जादा ९ वैद्यकीय अधिकारी, १६ स्टाफ नर्स, ९ लॅब टेक्निशियन, ५ एक्सरे टेक्निशियन, ५ परिचर, सफाई कामगार, २५ प्रशिक्षणार्थी डॉक्टर, ५ फार्मसिस्टची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. उष्माघात टाळण्यासाठी शहरात आरोग्यसेवकांकडून जनजागृती करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे शीतकक्ष स्थापन करण्यात आला आहे. अत्यावश्यक संदर्भ सेवेसाठी १०२/ १०८ अंबुलन्सेस तयार ठेवण्यात आल्या आहेत.

असा असेल प्रस्थान सोहळा-

• पहाटे पाचपासून धार्मिक विधींना प्रारंभ

• सात वाजल्यापासून दर्शनबारी भाविकांसाठी खुली

• दुपारी बारा वाजता महानैवेद्य

• काल्याचे कीर्तन

• माऊलींच्या पादुकांची प्रदक्षिणा

• समाधी मंदिरात महापूजा

• सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात

प्रस्थान सोहळा लाईव्ह
माऊलींच्या पालखी सोहळ्याला शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वासंह मानाच्या दिंड्या आणि त्यामधील सहभागी दिंडीकऱ्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला जातो. मात्र अलंकापुरीत दाखल झालेल्या सर्वच भाविकांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येत नाही. या भाविकांबरोबरच जगभरातील नागरिकांना हा सोहळा पाहता यावा, याकरिता देवस्थानच्या वतीने या सोहळ्याचे फेसबुक लाईव्ह केले जाणार आहे. त्यामुळे जगभरातील नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे. आतापर्यंत देवस्थानच्या वतीने सध्या माऊली मंदिरातील विविध दैनंदिन धार्मिक कार्यक्रम, कीर्तन आणि प्रवचनांचे फेसबुक लाईव्ह केले जात आहे. वीणा मंडपात पार पडणाऱ्या प्रस्थान सोहळ्याच्या थेट फेसबुक आणि यूट्युब लाईव्हकरिता देवस्थान सज्ज झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *