शनिवार आणि रविवारी विविध

साहित्यिक उपक्रमांचे आयोजन

आळंदी : संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृदांवन फाऊंडेशनतर्फे आळंदी येथे आजपासून (दि. १८) दोन दिवसीय पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील एमआयटी महविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे उद्घाटन पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी संमेलनाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी, संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष, संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज, स्वागताध्यक्ष ह. भ. प. माधव महाराज नामदास, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानाचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर, संत चोखामेळा अध्यसनाच्या अध्यक्ष प्रा. उल्का चंदनशिवे, संमेलनाचे निमंत्रक, संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील उपस्थित होते. श्री ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा अभंग गाथा, चोखोबारायांचा गाथा तसेच संत चोखामेळा महाराज यांच्या मूर्तीचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले.

“त्या काळातील समाजव्यवस्थेमुळे संत चोखामेळा पांडुरंगाच्या चरणी पोहोचू शकले नाहीत. संत चोखामेळा यांचे कार्य प्रदीर्घ काळ दुर्लक्षित राहिले याचा खेद आहे, परंतु आज त्यांच्या नावे होत असलेल्या या पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान मिळाला याचा आनंद आहे”, अशा भावनाही औसेकर यांनी व्यक्त केल्या. दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन पंढरपूर येथे भरवावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

मान्यवरांचे स्वागत प्रा. अप्पासाहेब पुजारी, प्रा. उल्का चंदनशिवे, ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज देहूकर, माणिकराव सोनवणे, प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी केले. सूत्रसंचालन ह. भ. प. प्रसाद माटे महाराज यांनी तर ह. भ. प. माधव महाराज नामदास यांनी आभार मानले. संमेलन स्थळाला श्री संत नामदेव महाराज साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे.

संमेलनातील कार्यक्रम –

शनिवार, दि. १८ नोव्हेंबर नाव नोंदणी सकाळी ८ ते १०

उ‌द्घाटन सोहळा – सकाळी १० ते १२

उद्‌घाटक – मा. ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर (अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर.)
प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी (संत चोखामेळा महाराज यांचे चरित्रलेखक व संशोधक)
प्रमुख उपस्थिती – ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर (संत तुकाराम महाराज यांचे वंशज) ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज देहूकर (संत तुकाराम महाराज यांचे वंशज)
स्वागताध्यक्ष – मा. ह. भ. प. माधव नामदास महाराज (संत नामदेव महाराज यांचे वंशज)

दुपारी १२:१५ ते १:३०
परिसंवाद
सत्राध्यक्ष – प्रा. अभय टिळक (मा. विश्वस्त, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी)
विषय : श्री चोखोबांची विठ्ठलभक्ती – वक्ते – श्री. रजनीश जोशी

विषय : संत चोखोबांनी केलेले विठ्ठलाचे रूपवर्णन – वक्ते – श्री. ह. भ. प. सचिन महाराज पवार (संपादक, वारकरी दर्पण)

विषय : संत चोखामेळा यांनी विठ्ठलभक्तीचे पटवून दिलेले महत्त्व – वक्ते : डॉ. रूपेशकुमार जावळे

विषय : संत चोखामेळा यांची आर्तता – वक्ते : प्रा. सचिन पवार

दुपारी १:३० ते २ भोजन-विश्राम

दुपारी ३:४५ ते सायं. ५.०० – कविसंमेलन
अध्यक्ष : प्रा. रुपाली अवचरे
सहभाग – युवराज जळे, डॉ. अरविंद हगरगेकर, प्रा. मिनाक्षी पाटील, शाम नवले, हनुमंत पडवळ, डॉ. मधुकर हुजरे, संजय धोंगडे, शशिकला गुंजाळ, सुरज अंगुले, उज्वला शिंदे, पोपट माळी, शिवाजी गायकवाड, बाळ पाटील, पूजा माळी, संध्याराणी कोल्हे.

दुसरे सत्र –
दुपारी २ ते ३:३० – परिसंवाद
सत्राध्यक्ष – ह. भ. प. दीपक महाराज जेवणे
विषय : संत चोखामेळा यांनी विठ्ठलाला विचारलेले सवाल –
वक्ते – प्रा. डॉ. गणेश मारवाड

विषय : चोखोबाचा पंढरी महिमा – वक्ते : डॉ. शांताराम बुढे

विषय : संत चोखामेळा यांची सामाजिक जाणीव –
वक्ते – प्रा. नानासाहेब गव्हाणे

दुपारी ३:३० ते ३:४५ चहापान

दुपारी ६:३० ते सायं. ७.३०

विषय : संत कवयित्री सोयराबाई एक काव्यप्रवास

सहभाग – कवयित्री – ज्योत्स्ना चांदगुडे, अस्मिता जोगदंड-चांदणे, वैशाली मोहिते

रात्री ७:३० ते ८.०० भोजन

रात्री ८.०० ते ५.००

कविसंमेलन –
अध्यक्ष – पुरुषोत्तम सदाफुले
सहभाग – अलका सपकाळ, प्रा. विमलाताई मोरे, प्रकाश गटहाणे, राजेंद्र वाघ, ह. भ. प. सुभाष महाराज बडधे, फुलचंद नागटिळक, प्रा. विनोद ताम्हाणे, दत्तात्रय खंडागळे, प्रा. दिगंबर ढोकले, पितांबर लोहार, अश्विनी जोशी, धनंजय सोलंकर, प्रभाकर वाघोले, शामराव सरकाळे, वर्षा बालगोपाल, सारिका माकोडे, सुरेश कंक, प्रियाका शेंडे, प्रतिमा काळे.

रविवार, १९ नोव्हेंबर

तिसरे सत्र
सकाळी ९ ते १०:३० – परिसंवाद
सत्राध्यक्ष : श्री. विद्याधर ताठे
विषय : संत सोयराबाई व संत निर्मळा याचे हृदयस्थ नाते वक्ते : डॉ. रुपाली शिंदे
विषय : विठ्ठलाने केलेले सोयराबाईचे बाळंतपण – वक्ते ह. भ. प. आनंद महाराज तांबे
विषय : संत सोयराबाई यांची सामाजिक जाणीव – वक्ते प्रा. सोमनाथ लांडगे

सकाळी १०:३० ते १०:४५ चहापान
अध्यक्ष : ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर (संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज)

चौथे सत्र
सकाळी १०.४५ ते १२:०० – परिसंवाद
सत्राध्यक्ष : डॉ. श्यामाताई घोणसे

विषय : संत चोखामेळा कृत रुपक/भारूड – वक्ते डॉ. भावार्थ देखणे

विषय : संत चोखोबा कृत संत नामदेव स्तुती वक्ते : डॉ. अमोघसिद्ध चेंडके

विषय : संत चोखामेळा यांच्या अभंगातील तत्त्वज्ञान वक्ते – ह. भ. प. पांडुरंग शास्त्री शितोळे महाराज
विषय : संत सोयराबाई यांनी विद्वलाला विचारलेले सवाल – वक्ते डॉ. यशोधन साखरे
दुपारी १२:१५ ते १:३०
गजर भक्तीचा – सन्मान श्रद्धेचा
शुभहस्ते – मा. बाळासाहेबजी चौधरी (मा. क्षेत्र कार्यवाह, रा. स्व. संघ)

प्रमुख पाहुणे – मा. शेषाद्री अण्णा डांगे (क्षेत्रमंत्री, विद्याभारती)

प्रमुख उपस्थिती –
ह. भ. प. प्रा. पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर (अध्यक्ष, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज संस्थान, देहू)
प्राचार्या उल्काताई चंदनशिवे (अध्यक्ष, संत घोखामेळा अध्यासन केंद्र)

दुपारी २ ते ३ : चोखोबा वाणी – भजन गायन
सादरकर्ते – ह. भ. प. प्रसाद माडे महाराज चऱ्होलीकर आणि शिष्य परिवार.

समारोप सोहळा
विशेष अतिथी : मा. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड (अध्यक्ष, एमआयटी विश्वशांती केंद्र, पुणे)
अध्यक्ष : मा. डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ)

संमेलनाध्यक्ष : प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी
प्रमुख पाहुणे : पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *