नियंत्रण कक्ष तयार करून सुविधा देण्याच्या सूचना dehu beej ceremoney । 

देहू : प्रतिनिधी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविक, वारकऱ्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेसाठी स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, निवारा, वैद्यकीय सेवा, वाहतूक व्यवस्था, कायदा सुव्यवस्था आदी विविध विभागांनी नियोजन आराखडा तयार करा. प्रत्येक विभागाने एक नोडल अधिकारी नेमून समस्या सोडवाव्यात. देहू नगरपंचायतीमध्ये नियंत्रण कक्ष तयार करून त्वरित अडचणी सोडवाव्यात, अशा सूचना पिंपरी-चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिल्या.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५व्या वैंकुठगमण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत कार्यालयात अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बीज सोहळा नियोजन आढावा घेण्यात आली. या वेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, नगराध्यक्षा पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे, विस्ताराधिकारी महेश वाघमारे, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे अधिक्षक लक्ष्मण तनपुरे, पुणे महानगर परिवहन महामंडळ आगार प्रमुख भास्कर दहातोंडे, वाहतूक विभागाचे चिंतामण जोशी, पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, एलआयबीचे अजित सावंत, संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, जयेश मोरे, मंडल अधिकारी दीपक नरवडे, तलाठी सूर्यकांत काळे, नगरसेवक प्रवीण काळोखे, योगेश परंडवाल, योगेश काळोखे, आदित्य टिळेकर, सचिन कुंभार, प्रदीप परंडवाल, नरगसेविका पूनम काळोखे, सपना मोरे, प्रियंका मोरे आदी उपस्थित होते.

या आहेत सुविधा व्यवस्था dehu beej ceremoney ।
पाणी पुरवठ्याचे नियोजन, स्वच्छता, पाटबंधारे विभाग, महावितरण विभागाशी पत्रव्यवहार, पाण्याच्या टॅकरची व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून नदीघाट परिसर, गावातील स्वच्छता, कचरा वाहतुकीचे नियोजन, नदीपात्रातील जलपर्णी काढणे याचे नियोजन केले आहे. चौदा टाळकरी कमान ते गाथामंदिर रस्त्यावर १० सीसीकॅमेरे बसविणार असल्याचे सांगितले

या केल्या सूचना dehu beej ceremoney ।
महावितरणच्या सहाय्यक अभियंता एस. एस. हंचाटे यांनी २४ तास सेवा उपलब्ध असणार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी फिडर वरून वीज पुरवठा करण्यात येईल, गावातील रोहित्रे सुरक्षित करू असे सांगितले. पाटबंधारे विभागाने नदीला पाणी दोन टप्प्यात सोडावे, पहिल्या टप्प्यात जलपर्णी वाहून आली तर ती काढण्यास वेळ मिळेल अशी सूचना योगेश परंडवाल यांनी केली. पुणे महानगर परिवहन विभागाच्या वतीने यात्रा काळात १५० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या काळात बसेसचे कोणतेही भाडे वाढवू नये, अशी मागणी संस्थानच्या वतीने करण्यात आली. बस बाह्यवळण मार्गाने न्याव्यात, पार्किंग गायरानात करावी अशी सूचना पोलिसांनी मांडली. संस्थानच्या वतीने पाणी पुरवठा, मंदिर परिसर स्वच्छता, जलपर्णी, पालखी मार्ग मोकळा ठेवणे आणि स्थानिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मुभा द्यावी या संदर्भात सूचना मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *