हरिनाम सप्ताहाचे आयोजन

देहूगाव : तीर्थक्षेत्र देहू येथे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा (तुकाराम बीज) फाल्गुन शुद्ध दशमी म्हणजेच रविवारपासून (दि. १३) पासून सुरू झाला आहे. यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी केले आहे.

रविवारपासून सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळा सोमवारपर्यंत (दि. २१) असणार आहे. या दिवशी सकाळी नऊ वाजता प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.

पहिल्या दिवशी दुपारी चार वाजता पुरुषोत्तम महाराज मोरे यांची प्रवचन सेवा, संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत आसाराम महाराज बडे यांचे कीर्तन झाले. सोमवारी (दि. १४) ज्ञानेश्वर महाराज दौंडकर यांचे प्रवचन होऊन सायंकाळी निवृत्ती महाराज रायते यांचे कीर्तन झाले.

या सप्ताहाअंतर्गत सुखदेव महाराज ठाकर, सागर महाराज शिर्के, दत्तात्रय महाराज सोळसकर, आनंद महाराज तांबे, कृष्णा महाराज पिंगळे यांचे प्रवचन होईल. तर दररोज संध्याकाळी संतोष महाराज काळोखे, भागवताचार्य भागवत महाराज बादाडे, अनिल महाराज वाळके, महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर, शंकर महाराज शेवाळे, पंडित महाराज क्षीरसागर यांचे कीर्तन हाईल.

या कार्यक्रमाचे संयोजक सुखदेव महाराज ठाकर आणि संतोष महाराज काळोखे हे आहेत. शनिवारी (दि.१९) वारकरी संगीत विभागाचे उद्‌घाटन या विभागाचे प्रमुख पंडित कल्याण गायकवाड यांच्या हस्ते सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *