श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा
पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार
पंढरपूर : पर्यावरण जनजागृतीसाठी प्रयत्न केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील युवकांचा पंढरपुरात सन्मान करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने निसर्ग संवर्धन या विषयावर वक्तृत्व आणि पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. हरित वारी उपक्रमाचे शिल्पकार आणि मंदिरे समिती समितीचे विश्वस्त ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीच्या विश्वस्त माधवीताई निगडे यावेळी उपस्थित होत्या.
व्हिडिओ : स्वाती गोडसे, पंढरपूर