शिळा मंदिर लोकार्पणासाठी

येणाऱ्या मोदींचे खास स्वागत

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १४ जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा देहूत पार पडणार आहे. या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून, मोदी यांना मंदिर ट्रस्ट तर्फे विशेष डिझाईनची पगडी घालण्यात येणार आहे. याकरिता पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांना देहू संस्थान विश्वस्तांनी दोन डिझायनर तुकाराम पगड्या आणि उपरणे तयार करण्याची ऑर्डर दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १४ जून रोजी जगतगुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा देहूत पार पडणार आहे. या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून, मोदी यांना मंदिर ट्रस्ट तर्फे विशेष डिझाइनची पगडी घालण्यात येणार आहे. याकरिता पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांना देहू संस्थांन विश्वस्तांनी दोन डिझायनर तुकाराम पगड्या आणि उपरणे तयार करण्याची ऑर्डर दिली आहे.
पगडीबाबत माहिती देताना मुरूडकर झेंडेवाले म्हणाले, डिझायनर तुकाराम पगडी ही भपकेबाज नसून पारंपरिक असणार आहे. या मागचा आमचा उद्देशही तसाच असेल. आज तुकाराम महाराजांच्या विचारांची गरज आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ज्या पद्धतीने तुकाराम महाराज जशी पगडी घालायचे तशी पगडी आम्ही बनवली आहे. यासाठी त्या काळी जे कापड ही पगडी बनविण्यासाठी वापरले जात होते, त्याच पद्धतीचे कापड आम्ही वापरले असून, ही पगडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती घातल्यावर गंध आणि टिळा हा वेगळा लावण्याची गरज पडत नाही.

तुळशीच्या माळांची सजावट
मुरूडकर झेंडेवाले म्हणाले, तुकाराम महाराज हे संत होते. त्या दृष्टीने या पगडीला आम्ही तुळशीच्या माळांनी सजावट केलीय. यासाठी विशिष्ट पद्धतीने याची बांधणी केली आहे. ऑफ व्हाइट रंगाची ही पगडी असेल. याच कापडाचे उपरणेही बनविण्यात आले आहे. याच कापडावर तुकोबांचे निवडक अभंगही लिहिले आहेत. उपरण्यावर हिंदी आणि मराठी अभंग असतील. तसेच पगडीवरही एक अभंग आहे आणि हे अभंग हस्तलिखित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *