रुक्मिणी मातेच्या पालखीचे
पंढरपूर पायी वारीसाठी प्रस्थान
कौंडण्यपूर : रुक्मिणीमातेचे माहेर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथून आषाढी वारीसाठी रुक्मिणीमातेच्या पालखीने प्रस्थान ठेवले आहे. गेल्या ४२७ वर्षांपासून सुरू असणाऱ्या या पालखी सोहळ्यात गेली दोन वर्षे कोरोनामुळे खंड पडला होता.
मानाच्या पालख्यांपैकी एक असणाऱ्या या पालखीचा प्रस्थान सोहळा शुक्रवारी (दि. ३) दुपारी तीन वाजता पार पडला. टाळ, मृदंगाच्या गजरात भगव्या पताका घेतलेल्या वारकऱ्यांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पालखीचे पूजन केले. तसेच आपल्या खांद्यावर पालखी घेऊन त्यांनी पालखी पंढरपूरकडे रवाना केली. यावेळी ठाकूर यांनी फुगडीचा फेरही धरला.
कोरोना सावटाखाली गेली दोन वर्षे रुक्मिणीमातेची मानाची पालखी मोजक्या वारकऱ्यांसह पंढरपूरला गेली होती. यंदा या पायी वारी सोहळ्यात सर्वांना सहभागी होता येणार असल्याने वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालखीचा पायी वारी कार्यक्रम नियोजन पुढीलप्रमाणे –
दि. ३ जून – कौंडण्यपूर येथून प्रस्थान – रात्री तरोडा, ता. तिवसा येथे मुक्काम
दि. ४ जून – सकाळी तरोडा, ता. तिवसा येथून प्रस्थान – रात्री कुऱ्हा, ता. तिवसा येथे मुक्काम
दि. ५ जून – सकाळी कुऱ्हा, ता. तिवसा येथून प्रस्थान – रात्री मार्डी, ता. तिवसा येथे मुक्काम
दि. ६ जून – सकाळी मार्डी, ता. तिवसा येथून प्रस्थान – रात्री एकविरा देवी संस्थान, अमरावती येथे मुक्काम.
दि. ७ जून – सकाळी एकविरा देवी संस्थान येथून प्रस्थान – सातूरणा, अमरावती येथे मुक्काम.
दि. ८ जून – सकाळी सातूरणा येथून प्रस्थान – रात्री जुनी वस्ती, बडनेरा येथे मुक्काम.
दि. ९ जून – सकाळी जुनी वस्ती बडनेरा येथून प्रस्थान – रात्री लोणी टाकळी येथे मुक्काम.
दि. १० जून – सकाळी लोणी टाकळी येथून प्रस्थान – रात्री धनज, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथे मुक्काम.
दि. ११ जून – सकाळी धनज, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथून प्रस्थान – रात्री श्री. रामनाथ स्वामी संस्थान, धनज, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथे मुक्काम.
दि. १२ – जून सकाळी श्री. रामनाथ स्वामी संस्थान, धनज, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथून प्रस्थान – रात्री बारालिंग मंदिर, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथे मुक्काम.
दि. १३ जून – सकाळी बारालिंग मंदिर, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथून प्रस्थान – रात्री पोघात, ता. मंगरूळ नाथ, जिल्हा वाशीम येथे मुक्काम.
दि. १४ जून – सकाळी पोघात, ता. मंगरूळ नाथ, जिल्हा वाशीम येथून प्रस्थान – रात्री तुकडोजी महाराज आश्रम, मंगरूळ नाथ, जि. वाशीम येथे मुक्काम.
दि.१५ जून – सकाळी तुकडोजी महाराज आश्रम, मंगरूळनाथ, जि. वाशीम येथून प्रस्थान – रात्री कसोडा, ता. मंगरूळ नाथ, जिल्हा वाशीम येथे मुक्काम.
दि. १६ जून – सकाळी कसोडा, ता. मंगरूळ नाथ, जिल्हा वाशीम येथून प्रस्थान – रात्री रेनॉल्ड हॉस्पिटल, जि. वाशीम येथे मुक्काम.
दि. १७ जून – सकाळी रेनॉल्ड हॉस्पिटल, जि. वाशीम
येथून प्रस्थान – रात्री कण्हेरगाव नाका, जि. हिंगोली येथे मुक्काम.
दि. १८ जून – सकाळी कण्हेरगाव नाका, जि. हिंगोली येथून प्रस्थान – रात्री मु.पो. भांडेगाव, जि. हिंगोली येथे मुक्काम.
दि. १९ जून – सकाळी मु.पो. भांडेगाव, जि. हिंगोली
येथून प्रस्थान – रात्री पोस्ट ऑफिस रोड, जैन मंदिर, जि. हिंगोली येथे मुक्काम.
दि. २० जून – सकाळी पोस्ट ऑफिस रोड, जैन मंदिर, जि. हिंगोली येथून प्रस्थान – रात्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथे मुक्काम.
दि. २१ जून – सकाळी नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथून प्रस्थान – रात्री श्री. हटकेश्वर देवस्थान, जिल्हा हिंगोली येथे मुक्काम.
दि. २२ जून – सकाळी श्री. हटकेश्वर देवस्थान, जिल्हा हिंगोली येथून प्रस्थान – रात्री रोडकेश्वर मंदिर संस्थान, जिल्हा परभणी येथे मुक्काम.
दि. २३ जून – सकाळी रोडकेश्वर मंदिर संस्थान, जिल्हा परभणी येथून प्रस्थान – रात्री मु.पो. दैठना, जिल्हा परभणी येथे मुक्काम.
दि. २४ जून – सकाळी मु.पो. दैठना, जिल्हा परभणी येथून प्रस्थान – रात्री संत जनाबाई मठ, गोदातट येथे मुक्काम.
दि. २५ जून – सकाळी संत जनाबाई मठ, गोदातट येथून प्रस्थान – रात्री नेहरू चौक, परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे मुक्काम.
दि. २६ जून – सकाळी नेहरू चौक, परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथून प्रस्थान – रात्री काळा मारोती संस्थान, अंबेजोगाई येथे मुक्काम.
दि. २७ जून – सकाळी काळा मारोती संस्थान, अंबेजोगाई येथून प्रस्थान – रात्री पळसखेड, ता. केज, जि. बीड येथे मुक्काम.
दि. २८ जून – सकाळी पळसखेड, ता. केज, जि. बीड येथून प्रस्थान – रात्री विद्याभवन हायस्कूल, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे मुक्काम.
दि. २९ जून – सकाळी विद्याभवन हायस्कूल, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथून प्रस्थान – रात्री कण्हेरवाडी, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे मुक्काम.
दि. ३० जून – सकाळी कण्हेरवाडी, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथून प्रस्थान – रात्री पाथरी, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर येथे मुक्काम.
दि. १ जुलै – सकाळी पाथरी, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर येथून प्रस्थान – रात्री उत्तरेश्वर मंदिर, बार्शी येथे मुक्काम.
दि. २ जुलै – सकाळी उत्तरेश्वर मंदिर, बार्शी येथून प्रस्थान – रात्री खंडेश्वर मंदिर, खांडवी येथे मुक्काम.
दि. ३ जुलै – सकाळी खंडेश्वर मंदिर, खांडवी येथून प्रस्थान – रात्री जगदंबा मंदिर, माढा, जिल्हा सोलापूर येथे मुक्काम.
दि. ४ जुलै – सकाळी जगदंबा मंदिर, माढा, जिल्हा सोलापूर येथून प्रस्थान – रात्री शेटफळ, ता. मोहोड, जि. सोलापूर येथे मुक्काम
दि. ५ जुलै – सकाळी शेटफळ, ता. मोहोड, जि. सोलापूर येथून प्रस्थान – रात्री श्री. रेणुका विद्यालय, बाभूळगाव, सोलापूर येथे मुक्काम
दि. ७ जुलै – सकाळी श्री. रेणुका विद्यालय, बाभूळगाव, सोलापूर येथून प्रस्थान – रात्री मुक्ताबाई वारकरी शिक्षण संस्था, पुलगाव येथे मुक्काम
दि. ८ जुलै – रात्री ८ वाजता कीर्तन
दि. ९ जुलै – रात्री ८ वाजता कीर्तन
दि. १० जुलै ( आषाढी एकादशी ) – रात्री ८ वाजता कीर्तन