खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या
राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना सूचना
पुणे : पुणे शहर आणि परिसरातून जाणाऱ्या पालखी मार्गाचे काम वेगाने पूर्ण व्हावे, अशा सूचना भाजपच्या नवनिर्वाचित खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आढावा बैठकीत दिल्या.
याप्रसंगी ह. भ. प. मारुती महाराज कोकाटे (वारीचे अध्यक्ष), संजय कदम (प्रोजेक्ट डायरेक्टर), अभिजीत आवटे, सौरभ गांधी (साइट इंजिनियर), डी. श्रीनिवास राव, किशोर भारेकर इ. अधिकारी उपस्थित होते.
आषाढी वारीच्या पालखी मार्गातील विविध अडथळे आणि कामे मार्गी लावली जावीत. ‘पालखी मार्ग’ कसा सुसज्ज व व्यवस्थित होईल, याबाबतीत नियोजन करण्यात आले. पालखी मार्गासाठी जो महामार्ग निश्चित करण्यात आला आहे त्या महामार्गाचे जागांचे ताबे घेऊन रुंदीकरण करणे, रस्त्यांची राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करणे, मार्गावरचे राडारोडा हटवणे, सावलीसाठी 10 हजार वृक्षांचे रोपण या व अशा अनेक मुद्द्यांवर बैठक घेण्यात आली.
यासोबतच आगामी पालखी सोहळा लक्षात घेता, दि. 30 मेपर्यंत पालखी मार्गाचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली.
जागेच्या ताब्यासंदर्भातली अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे, असे कुलकर्णी म्हणाल्या.
यावेळी त्यांनी चांदणी चौकात क्रॉसिंग ब्रिज लवकर पूर्ण करावा आणि संदिग्ध दिशादर्शक फलक काढून सुस्पष्ट फलक लावण्याची सूचना केली.