मैत्री, बंधुभाव आणि सलोख्याची परंपरा
पंढरपूरच्या आषाढी वारीला संत तुकाराम महाराजांची पालखी निघते, तेव्हा वेशीच्या बाहेर पहिला विसावा होतो तो सूफी संत अनगडशाह बाबा यांच्या दर्ग्यावर. संत तुकोबारायांचे समकालीन, समविचारी असणारे हे थोर सत्पुरुष. या दोघांनी घालून दिलेला बंधुभाव आणि सलोख्याची परंपरा आजही दोन्ही बाजूंकडून पाळली जाते.
– ह. भ. प. अनिकेत मोरे-देहूकर