अनाथ महाराष्ट्राला सनाथ करणारा लोकनाथ
मध्ययुगीन काळात तेज हरपलेल्या, अनाथ महाराष्ट्राला आत्मबळ देऊन ज्यांनी सनाथ केलं, संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शोधून ज्यांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली, मराठी भाषेला ज्यांनी गतवैभव प्राप्त करून दिलं. गोरगरीब, उपेक्षित जनतेला ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश दाखविला, आपल्या लेखणी, वाणी, आचरणातून ज्यांनी समाजासमोर चिरंतन आदर्श उभा केला ते अनाथांचे नाथ, लोकनाथ संत एकनाथ!