
काशीमधील गंगाजल कावडीत भरून ते दक्षिणेतील रामेश्वरमच्या समुद्राला अर्पण करण्याची परंपरा जुनी आहे. शेकडो किलोमीटरची ही पायी कावडयात्रा करणारे लोक संत एकनाथांच्या काळातही होते. एका वर्षी एकनाथ महाराजही त्यांच्यात सामील झाले. या धार्मिक परंपरेतील खरं पुण्य कोणतं, हे नाथबाबांनी आपल्या कृतीतून दाखवलं. ती कृती म्हणजेच, ही सुप्रसिद्ध घटना.