‘संत तुकाराम महाराजांचा अभंग गाथा’ इंद्रायणी नदीत बुडविल्याचा प्रसंग सर्वांना माहीत आहे. तसाच प्रकार पूर्वी म्हणजे १५व्या शतकात संत एकनाथांच्या बाबतीत घडला होता. नाथ महाराजांनी लिहिलेला ‘भागवत ग्रंथ’ काशीच्या पंडितांनी गंगा नदीत बुडवला होता; मात्र नंतर त्याचं महत्त्व लक्षात आल्यानं पंडितांनीच एकनाथी भागवताची काशीमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली होती.
