राधाकृष्ण विखे पाटील यांनी
केली माहूरगडावर देवीची पूजा
नांदेड : गेले दोन वर्षे कोविड -१९ मुळे अनेक धार्मिक स्थळांवर निर्बंध पाळावे लागले. त्यामुळे कोविडसारखी संकटे कायमची दूर व्हावीत, अशी प्रार्थना माहूरच्या रेणुकादेवीच्या चरणी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली. माहूरगडावर श्री रेणुकादेवीची सपत्निक पूजा आज (दि. २६ सप्टेंबर) त्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह संस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते.
माहूरगडावर श्री रेणुकामातेची वैदिक महापूजा आणि घटस्थापना संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे सचिव किर्तीकिरण एच. पुजार हेही सपत्निक पूजेत सहभागी झाले. याचबरोबर कुमारीकापूजन, सुहासिनीपूजन, प्रथेप्रमाणे गणेशपूजन, कलशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा संस्थानचे उपाध्यक्ष विजय डोंगरे, तहसिलदार तथा संस्थानचे कोषाध्यक्ष किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, बालाजी जगत, दुर्गादास भोपी, अरविंद देव, अशिष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढील दहा दिवस पूजेसह विविध कार्यक्रमांचेही माहूरगडावर आयोजन करण्यात आलेले आहे. भक्तांना ऑनलाईन दर्शन आणि विविध कार्यक्रमांच्या वेळापत्रकाची माहिती संस्थानच्या वतीने वेबसाईटवर करून देण्यात आली आहे.