पारधी समाजातील लोक केवळ

संशयावरून पोलिसांनी डांबले

आळंदी : आळंदीत एकीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारीचा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात सुरू असतानाच, दुसरीकडे या सोहळ्यात चोऱ्या वगैरे होऊ नयेत म्हणून सुमारे १५० संशयित लोकांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आले आहे. यातील बहुतेक लोक फासेपारधी समाजाचे आहेत.
adidas yeezy boost 350
adidas sale
adidas shop
adidas running shoes
adidas on sale
adidas yeezys
adidas yeezy boost
adidas yeezy 700 v3
best adidas running shoes women
adidas store
adidas yeezy 350 boost v2 bred
adidas outlet online
adidas ultraboost
adidas outlets
adidas shoes sale
best adidas shoes
adidas outlet store orange
adidas ultra boost
adidas yeezy 350 boost
adidas factory outlet
new adidas yeezy
adidas yeezy 700 boost
adidas yeezy womens
adidas mens shoes sale
adidas promo code
adidas mens shoes sale
adidas yeezy 500
cheap adidas shoes
adidas yeezy black
adidas women sneakers
adidas yeezy sneakers
adidas ultra boost
adidas yeezy mens
adidas yeezy sneakers
adidas yeezy 500
adidas yeezy 700 v3
adidas yeezy shoes
adidas store houston
adidas yeezys 700
adidas outlet online
adidas for sale

पोलिसांनी शनिवारी (दि. १०) सायंकाळच्या सुमारास मंदिर परिसरात चार ते पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर शहरातून जवळपास १५० लोकांना ताब्यात घेण्यात आले. यात बहुतेक पारधी समाजाचे लोक असून त्यांना रविवारीही (दि.११) रात्रभर पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्यात आले होते.

ताब्यात घेतल्याचा निषेध म्हणून यातील काही लोकांनी पोलीस स्टेशनमध्येच उपोषण सुरू केले. हा प्रकार समजल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुनिता भोसले आणि प्रमोद काळे आळंदीत आले. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु ते प्रस्थान सोहळ्यात व्यस्त असल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत भेटू शकले नाहीत.

विशेष म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये महिला, लहान मुले, शाळकरी मुले यांची संख्या मोठी आहे. यातील अनेक लोक वारीमध्ये फुगे, खेळणी वगैरे विकून चरितार्थ चालवतात. काही पोटासाठी भीकही मागतात. अनेकांवर तर यापूर्वी कुठलेही गुन्हे नोंद नसतानाही त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही लोक दर्शनासाठी आले होते, त्यांनाही ताब्यात घेतले आहे. त्यात आमचे काही सामाजिक कार्यकर्तेही आहेत, असे सुनिता भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

या लोकांना ताब्यात का घेतले, याचे नेमके कारण पोलीस देत नाहीत. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. ताब्यात घेतलेले लोक श्रीगोंदा, दौंड वगैरे भागातून आलेले आहेत. ते वारीमध्ये फुगे, खेळणी वगैरे विकून चरितार्थ चालवतात. त्यांची कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आमच्या भागातील काही ज्येष्ठ नेत्यांनीही फोनवरून पोलिसांना या लोकांना सोडून देण्याची विनंती केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद काळे यांनी म्हटले आहे.

‘मॅक्स महाराष्ट्र’ या न्यूज पोर्टलवर याबाबत सुनिता भोसले आणि प्रमोद काळे या दोघांची सविस्तर मुलाखत घेण्यात आली. त्यात त्यांनी ही व्यथा मांडली आहे.

सामाजिक कार्यकर्ते ऍड. असिम सरोदे यांनी या प्रकरणी पोलिसांवर टीका केल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले आहे. पोलिसांना कायदा हातात घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत का? पोलिसांना मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत का? असे सवाल उपस्थित करून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या लोकांना त्वरित सोडून द्यावे, अशी मागणी सरोदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *