विश्वात्मक संत साहित्य संमेलन सुरू
आदमापूर : कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाची सुरुवात संत बाळूमामा यांच्या आदमापुरातून उत्साही ग्रंथ दिंडीने करण्यात आली.
मान कोल्हापूरला मिळाल्याने जिल्ह्यातील तमाम
श्री क्षेत्र आदमापूर येथे हजारो वारकर्यांच्या सहभागाने गावातील प्रमुख मार्गावरून टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडी सोहळ्यात वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
पहिल्या विश्वात्मक साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी आदमापूर येथील मरगुबाई मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून भजन आणि हरीनामाच्या जयघोषात ग्रंथदिंडी काढण्यात आली. संत बाळूमामांच्या मंदिरात या दिंडीची सांगता झाली.
संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती मदन गोसावी आणि डाॅ. रामचंद्र देखणे यांनी संत बाळूमामांच्यामूर्तीचे दर्शन घेतले. अध्यक्ष गोसावी आणि डाॅ. देखणे यांचा देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते आणि कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
दीपप्रज्वलन संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथपूजन अध्यक्ष धैर्यशील भोसले, तसेच वीणापूजन कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले.
‘विश्वशांतीसाठी संत साहित्य संमेलनांची गरज’ असल्याचे प्रतिपादन यावेळी न्यायमूर्ती गोसावी यांनी केले. स्वागत आणि प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा वारकरी मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वागवेकर यांनी केले. आभार मानसिंग किल्लेदार यांनी मानले. रात्री रामचंद्र देखणे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला.