आमदार अण्णा बनसोडे आणि
पिंपरीतील भाविकांची देणगी

पिंपरी : जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आमदार अण्णा बनसोडे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक यांनी चांदीचे सिंहासन, अभिषेक पात्र, मखर, पूजा साहित्य असे एकूण २१ किलो चांदीचे साहित्य आज (दि. १८ जून) देहू संस्थांनकडे अर्पण करण्यात आले.

या सिंहासनाचे पिंपरी-चिंचवडमधील भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी या सिंहासनाची मिरवणूक, पूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम चिंचवड येथे करण्यात आले. सोमवारी (दि. २० जून) देहू येथे सिंहासन आणि इतर साहित्याचा अर्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी आमदर आण्णा बनसोडे, ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर, पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले, ह. भ. प. संतोष महाराज मोरे, ह. भ. प. माणिक महाराज मोरे, ह. भ. प. संजय महाराज मोरे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त तसेच ह. भ. प. रामेश्वर महाराज शास्त्री, ह. भ. प. जगद्गुरुद्वाराचार्य अमृतनाथ महाराज जोशी, ह. भ. प. प्रकाश काळे, ह. भ. प. संतोष आनंद शास्त्री, ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील, ह. भ. प. भानुदास महाराज तुपे, ह. भ. प. पांडुरंग महाराज दातार, ह. भ. प. शेखर कुटे, ह. भ. प. मंगलदास महाराज जगताप, ह. भ. प. अर्जुन महाराज जाधव, ह. भ. प. उद्धव महाराज कोळपकर, तसेच ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर मंगलाताई कदम, अपर्णाताई डोके, आर. एस. कुमार, योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, विनोद नढे, राहुल भोसले, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आदींसह भक्त भाविक उपस्थित होते.

सिंहासनाची सकाळी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरापासून आमदार अण्णा बनसोडे यांचे नवीन जनसंपर्क कार्यालय, काळभोर नगर, चिंचवडपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी आमदार बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात बोलताना ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, ऐश्वर्य आणि वैराग्य हे तुकोबारायांचे गुण आहेत. जगद्गुरु संत तुकाराम यांना वडिलोपार्जित ऐश्वर्य मिळाले होते तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकाराम महाराजांना नजराणा भेट म्हणून पाठवला होता. वडिलोपार्जित ऐश्वर्य आणि प्रत्यक्षात छत्रपतींनी पाठवलेला नजराना नाकारून तुकोबारायांनी वैराग्य पत्करले. तुकोबारायांनी सांगितलेल्या भक्तिमार्गावर गेल्या साडे तीनशे वर्षांपासून लाखोंचा वारकरी सांप्रदाय मार्गक्रमण करीत आहे हे तुकोबारायांचे ऐश्वर्यच आहे. त्यांचे भक्त भाविक आमदार अण्णा बनसोडे आणि पिंपरी-चिंचवड मधील भक्तांनी दिलेले चांदीचे सिंहासन, अभिषेक पात्र हे देहू देवस्थान संस्थानने स्वीकारावे.

ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, देवसुद्धा वारकऱ्यांची, भक्तांची सेवा करण्यास इच्छुक असतो. ज्या तुकोबारायांनी कोट्यावधी भक्त भाविकांना नाम सांप्रदायाचा, सहिष्णुतेचा मार्ग दाखवला त्यांची सेवा करण्याची सद्बुद्धी आमदार अण्णा बनसोडे यांना मिळाली. अशी सेवा भविष्यातही बनसोडे यांच्या हातून घडो.

उपस्थितांचे स्वागत आमदार अण्णा बनसोडे, प्रास्ताविक ह. भ. प. शेखर महाराज कुटे, सूत्रसंचालन सुरेश गारगोटे, आभार ह. भ. प. सतीश महाराज गव्हाणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *