पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम
पुणे : सामाजिक सलोख्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आयुष्यभर कार्यरत असणारे सद्गुरू श्री जंगली महाराज यांचा १५ दिवस चालणारा १३२ वा पुण्यतिथी महोत्सव पुण्यात सुरू झाला आहे. यानिमित्ताने सलग १४ व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराज यांची समाधी असणाऱ्या जंगली महाराज मंदिरात गुढीपाडव्यापासून (दि. २ एप्रिल) यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात नित्य पूजाअर्चा, अखंड वीणा, प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, गायन, भजन अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. शुक्रवार दिनांक १५ एप्रिलपर्यंत हा सोहळा सुरू असणार आहे.
यंदाचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
अभ्यंगस्नान –
चैत्र शुद्ध प्रतिपदा, शनिवार दि. २ एप्रिल २०२२ या दिवशी सकाळी ६ वाजता. श्री शंकरराव आढाव बंधू यांचे सनईवादन. त्यानंतर सकाळी ७ वाजता समाधीस अभ्यंगस्नान, पूजा, भजन (सद्गुरू श्री जंगली महाराज भजनी मंडळ) आरती आणि प्रसाद
महिलांची भजने –
शनिवार दिनांक २ एप्रिल शुक्रवार ते दिनांक १५ एप्रिल २०२२ सायं ४ ते ५.४५ पर्यंत महिला भजनी मंडळांची भजने होतील.
व्याख्याने –
सायंकालीन ज्ञानसत्रातील व्याख्याने शनिवार दिनांक
२ एप्रिल ते शुक्रवार दिनांक १५ एप्रिल २०२२ अखेर प्रतिदिनी सायंकाळी ६ वाजता विद्वानांची व्याख्याने होतील.
संगीत सभा –
शनिवार दिनांक २ एप्रिल ते गुरुवार दिनांक १४ एप्रिल २०२२ अखेर रात्री ८ ते १० पर्यंत प्रसिद्ध गायक / कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम होतील.
मिरवणूक –
शुक्रवार दिनांक १५ एप्रिल २०२२ रोजी रात्री ९ वाजता श्री जंगली महाराजांच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक, सद्गुरू श्री जंगलीमहाराज भजनी मंडळासह, श्रीरोकडोबा मंदिर शिवाजीनगर गांवठाण येथून निघून समाधी मंदिरात येईल.
महाप्रसाद –
शनिवार दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १ नंतर मंदिरात सायंकाळपर्यंत प्रसाद देण्यात येईल.
व्याख्यानमालेमधील व्याख्याते आणि त्यांचे व्याख्यानाचे विषय पुढीलप्रमाणे –
(वेळ सायंकाळी ६ ते ७.२० पर्यंत)
१. शनिवार (२.४.२०२२) –
डॉ. योगेश गोडबोले – स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली
२. रविवार (३.४.२०२२) –
डॉ. सागर सु. देशपांडे – भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
३. सोमवार (४.४.२०२२) –
श्री. दत्तात्रेय भ. धाईंजे – सायबर सुरक्षा अभियान
४. मंगळवार (५.४.२०२२) –
पद्मश्री पोपटराव बा. पवार – प्रबोधनातून ग्रामसुधारणा
५. बुधवार (६.४.२०२२) –
श्री. श्रीनिवास दि. पेंडसे – श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आणि कार्य
६. गुरूवार (७.४.२०२२) –
प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी – श्री ज्ञानदेव-नामदेव अनुबंध
७. शुक्रवार (८.४.२०२२) –
डॉ. दत्तात्रेय पो. तापकीर – अध्यात्मिक उपासनेचे चतुर्विध सोपान
८. शनिवार (९.४.२०२२) –
डॉ. अविनाश वि. भोंडवे – कोरोना समस्येतून घ्यायचा धडा
९. रविवार (१०.४.२०२२) –
डॉ. चंद्रशेखर मो. टिळक – अर्थकारणी लोकमान्य टिळक
१०. सोमवार (११.४.२०२२) –
श्री. चंद्रकांत शां. शहासने – औषधाशिवाय रोगमुक्ती
११. मंगळवार (१२.४.२०२२) –
सौ. विद्या कृ. लव्हेकर – समर्थांची भारूडे
१२. बुधवार (१३.४.२०२२) –
श्री सचिन दि. पवार – गुरू हा संतकुळीचा राजा
१३. गुरूवार (१४.४.२०२२) –
डॉ. आदित्य शं. अभ्यंकर – श्रीमंत बाजीराव पेशवे
१४. शुक्रवार (१५.४.२०२२) –
डॉ. रविंद्र दि. भोळे – दया तेथे धर्म
कोरोनाची समस्या पूर्णपणे नाहीशी झाली नसल्याने, सर्व भाविकांनी कृपया हात सॅनिटायझरने निर्जंतूक करणे, मास्कचा वापर आणि शारीरिक अंतर ठेवणे आदी भान शासकीय नियमांचे पालन करावे. तसेच शासन आणि जिल्हाधिकारी पुणे, यांजकडून वेळोवेळी येणाऱ्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट यांनी केले आहे.