पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांचा
उत्साह दुणावला; पालखी वेळापुरात
वेळापूर : तुका म्हणे धावा। आहे पंढरी विसावा। असा संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणत पंढरी समीप आल्याने न राहवून धावत सुटलेले वारकरी, उत्साहात रंगलेले गोल रिंगण, तसेच या संत एकनाथांच्या भारुडांनी या उत्साहात आणलेली रंगत असा असा आजचा (दि. २५) चैतन्याचा दिवस संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी अनुभवला.
cheap jerseys
custom football uniforms
mlb custom jerseys
custom baseball jerseys
cheap custom jerseys
custom cheap jerseys
custom bowling jerseys
custom team jerseys
custom designs
custom football jerseys
custom nba jerseys
custom jersey maker
design jersey
best nfl jerseys of all time
custom basketball jerseys
nfl jersey
customized basketball jerseys
custom baseball jersey
custom softball jerseys
custom bowling jerseys
customize jersey
custom nfl jerseys
design your own jersey
best custom retro bowl jerseys
customize football jersey
nfl custom jersey
custom soccer jerseys
custom dodgers jersey
custom jerseys football
nike custom jersey
custom apparel
custom jersey
custom hockey jerseys
custom football uniforms
baseball jerseys custom
custom mlb jerseys
custom basketball uniforms
baseball uniforms
customized football jerseys online
custom jersey
custom nfl jersey
सकाळी साडेसहा वाजता माळशिरसहून निघालेला माऊलींचा पालखी सोहळा दुसर्या गोल रिंगणासाठी सकाळी साडेआठ वाजता अकलूजजवळील खुडूस फाटा (ता. माळशिरस) येथे पोहोचला. ढगाळ वातावरणात चोपदार राजाभाऊ यांनी रिंगण लावून घेतले. परंपरेप्रमाणे रिंगणाला सुरूवात झाली.
सकाळी साडेनऊ वाजता माऊलींचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला. लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा रिंगण सोहळा याची देही याची डोळा भाविकांनी अनुभवला. त्यानंतर वारकर्यांनी पारंपारिक पद्धतीचे खेळ खेळले. झिम्मा, फुगडी, हुतुतू हे मैदानी खेळ रंगले. या रिंगण सोहळ्यानंतर सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ झाला.
खुडूस ग्रामस्थांचे भक्तीपूर्ण स्वागत स्विकारून श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा निमगाव मगराचे (पाटी) येथे पोहोचला. निमगाव, विझोरी, विजयनगर आदी ग्रामपंचायतींच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ, इकोबोर्ड इंडस्ट्रिज, पिसेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले.
वेळापूर येथे डॉ. भाईनाथ महाराज कारखानीस उर्फ आनंदमूर्ती यांच्या समाधी मठाजवळील स्वागत स्विकारल्यानंतर पालखी सोहळ्याने वेळापूर हद्दीत प्रवेश केला. त्यावेळी वेळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने माजी उपसभापती उत्तमराव जानकर, सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच तानाजी चव्हाण यांच्यासह हजारो भाविकांनी माऊलींसह लाखो वैष्णवांचे उत्साही स्वागत केले.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पंढरीस जात असताना वेळापूरनजीक टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. त्यामुळे ते येथूनच पंढरपूरपर्यंत धावत सुटले अशी आख्यायिका आहे. तुका म्हणे धावा। आहे पंढरी विसावा।। हा तुकाराम महाराजांचा अभंग म्हणत वारकरी येथून धावतात. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येथील टेकडीवर गर्दी करत असत. पण यंदा रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने उतारावरुन सायंकाळी चार वाजता चोपदारांनी अश्वानंतर एक एक दिंडी सोडली. त्यावेळी माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत अबालवृद्ध वैष्णव पंढरी समीप आल्याने पंढरीच्या दिशेने धावत निघाले.
त्यानंतर रंगला भारुडांचा सोहळा. आळंदी-पंढरपूर या पायी वारीत वेळापूर येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर जयसिंग मोरे यांच्या रथापुढील शेडगे दिंडी क्रमांक ३च्या वतीने बावडा (ता. इंदापूर) येथील लक्ष्मण राजगुरू, वेळापूर येथील महादेव शेंडे महाराज आणि लातूर येथील कृष्णा महाराज जोगदंड यांनी मानाचे भारूड सादर केले. बुरगुंडा, वेडी, दादला आणि गौळण आदी रुपकांतून भारूडकरांनी भारूड सादर करून भाविकांचे मनोरंजनातून प्रबोधन केले. सायंकाळी सहा वाजता हा सोहळा समाज आरतीनंतर वेळापूर मुक्कामी विसावला.
उद्या (दि. २६) सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण ठाकूरबुवा समाधी येथे झाल्यानंतर वाडीकुरोली, टप्पा येथे माऊली आणि संत सोपानकाकांच्या बंधुभेटीचा सोहळा होईल. त्यानंतर सोहळ्याचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश होईल.