संत तुकाराम महाराजांवरील महत्त्वाचे ग्रंथ
जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवितकार्याचा विविधांगी आढावा घेणारे अभ्यासक हे एक प्रकारे तुकोबांच्या विचारपरंपरेतील टाळकरी आहेत. त्यांनी तुकोबांच्या जीवितकार्याकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. तुकोबांच्या कार्याचे आयाम स्पष्ट केले. तुकोबांची वैचारिक भूमिका, मांडणी आणि स्पष्टोक्ती यांचा नव्याने परिचय करून दिला.
– डॉ. श्यामसुंदर मिरजकर