तुकोबारायांचे सोबती असलेले तीन डोंगर
भामचंद्र, भंडारा आणि घोराडेश्वर या डोंगरांवरील संपन्न निसर्गाच्या सान्निध्यातच तुकोबारायांना अभंग स्फुरले. हे तीनही डोंगर त्यांच्या या लेखन प्रतिभेचे साक्षीदार आहेत. आपण तुकोबांचा वारसा जपणे म्हणजे त्यांची मंदिरे बांधणे, मूर्ती घडवणे हे आहेच. पण, त्याहूनही काकणभर महत्त्वाचे आहे, तुकोबांचे हे निसर्ग सोयरे जपणे. सांगत आहेत, पर्यावरण अभ्यासक बसवंत विठाबाई बाबाराव.