कीर्तन परंपरेतील संत तुकाराम महाराज
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, सुख-दु:खाच्या प्रसंगामध्ये सर्वसामान्य माणसाला तुकोबारायांचे अभंग आठवतात. जगण्याला आधार देतात. म्हणून तर बारशापासून तर पुण्यस्मरणापर्यंत वारकरी कीर्तन ठेवले जाते. हे कीर्तन तुकोबारायांच्या अभंगांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. खेडोपाड्यांमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने कीर्तने होत आहेत.
– ह. भ. प. चत्रभूज पाटील