संत तुकारामांचे जावई आणि टाळकरी
तुकाराम महाराजांची लाडकी कन्या भागीरथी आणि तिचे पती मालोजी यांची तुकोबांवर अत्यंत भक्ती होती. मालोजींनी तुकोबांना केलेल्या विनंतीवरून तुकोबांनी त्यांना मंत्रगीता दिली. त्यांना टाळकरी करून घेतले. मालोजी नित्यनेमाने मंत्रगीतेचे पठण करीत आणि तुकाराम महाराजांना कीर्तनात टाळकरी म्हणून साथ देत.