तुकोबारायांना प्रत्यक्ष पाहणाऱ्या संत बहिणाबाई
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांना प्रत्यक्ष पाहणाऱ्या, त्यांचा अनुग्रह मिळालेल्या शिष्या म्हणजे, संत बहिणाबाई. समाजाच्या विरोधाला तोंड देत, शूद्र समजल्या जाणाऱ्या तुकोबांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी तुकोबांच्या विद्रोही कवितेची परंपरा पुढे नेली. महाराष्ट्राच्या उज्ज्वल संत परंपरेला त्यांनी नवा उजाळा दिला.