एकनाथ महाराज हे समतावादी विचारांचे थोर वारकरी संत होते. त्यांनी जातिभेदाच्या विरोधात समतेचे विचार तर मांडलेच, पण प्रत्यक्ष आचरणातूनही तसाच आदर्श लोकांसमोर ठेवला. त्यासाठी त्यांनी हवी ती किंमत मोजण्याची तयारीही ठेवली. नाथमहाराजांनी पितर म्हणून आपल्या घरात दलितांना जेवू घातलं. तसंच ते पैठणमधील दलिताच्या घरीही जेवायला गेले. त्याचीच ही कहाणी.
