
समाज प्रबोधनाची भूमिका घेतलेल्या संत एकनाथांना छळण्याचा काही समाजकंटकांनी जणू विडाच उचलला होता. त्यांची कारस्थानं एवढ्या थराला गेली होती की, नाथांचे पुत्र हरिपंडित यांचे त्यांनी कान भरले. त्यामुळं वडिलांच्या विरोधात भूमिका घेत हरिपंडित सहकुटुंब काशीला निघून गेले. शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी तेही आव्हान पेललं. स्वत:च्या मुलाचं मन वळवून त्याला वारकरी बनवलं.