![](https://dnyanbatukaram.com/wp-content/uploads/2025/01/31.jpg)
वारकरी संप्रदाय पतितांचा उद्धार करणारा संप्रदाय आहे. कोणताही माणूस कितीही भ्रष्ट झाला, तरी त्याचे विचार बदलण्याचा प्रयत्न संत करतात. हाच विचार संत एकनाथांनी प्रत्यक्षात आणला. एक वेश्या आणि काही चोरांचं त्यांनी मनपरिवर्तन केलं. त्यांना सन्मार्गावर आणलं. त्यांना पुन्हा सन्मानानं जगण्याची संधी दिली. हे दोन्ही प्रसंग आजच्या काळातही पथदर्शक आहेत.