
संत एकनाथ महाराज फारच प्रेमळ आणि मातृहदयी होते. समाजातील सर्व घटकांविषयी त्यांच्या मनात जिव्हाळा होता. त्या काळात समाजात भेदभाव पाळला जात होता. नाथबाबा मात्र सर्वांना ममतेनं वागवत. आपल्या वर्तनातून ते समतेचा संदेश देत. घरी आलेल्या एका कष्टकरी वडार दाम्पत्याला त्यांनी अत्यंत सन्मानानं वागवलं. तीच ही प्रसिद्ध कथा.