तुकोबाराय आणि संत शेख महंमद महाराज
भागवत ग्रंथावर आणि ध्यानयोग साधनेविषयी चर्चा करण्यासाठी संत तुकोबाराय थेट श्रीगोंदे येथे संत शेख महंमदांची भेट घेण्यासाठी जात. श्रीगोंदे येथील दांडेकर मळ्यातील गणपती मंदिरात त्यांची आध्यात्मिक चर्चा चाले. यात समकालीन संत गोधडबुवा, प्रल्हाद महाराज, राऊळबुवा आदी संत सहभागी होत असत.
– डॉ. अनिल सहस्रबुद्धे