छत्रपती शिवराय आणि जगद्गुरू तुकोबाराय
शिवराय आणि तुकोबाराय यांचे चरित्र अभ्यासल्यानंतर असे आढळून येते, की तुकाराम महाराज जे मांडतात ते शिवराय अंगीकारतात. परस्त्रीकडे माता, भगिनी म्हणून पाहणे, जातिधर्मावरून भेदभाव न करणे, स्वातंत्र्य-समता-बंधुभाव, विवेकाचा पुरस्कार करणे आदी तुकोबांचे विचार शिवरायांनी आचरणात आणलेले दिसतात.
– ह.भ.प. उल्हास महाराज पाटील