संतांच्या अभंगांमधील टाळाचे उल्लेख
वारी ही खरे तर समूहभक्ती, ज्ञानभक्ती. पण, या ज्ञानाचा वगैरे अहंकार न बळगता, भक्तिप्रेमाचे टाळ घुळघुळा वाजवत, मृदंगाच्या तालावर नाचत, भजन गात वारकरी पंढरीला जातात. शब्दविठ्ठलाचा नाद लावणारा हा टाळ संतांच्या अभंगात ठाई ठाई वाजताना दिसतो.
– ह.भ.प. भागवत महाराज साळुंके