वारीच्या वाटेवर होणारा टाळांचा गजर
वाखरीच्या रिंगणात आनंदाची बरसातच होते. हजारो वारकऱ्यांच्या हातातील टाळ एका तालात, लयीत झणझणत असतात. आकाशाकडे उंचावलेल्या लाखो टाळांमधून केवळ ।।ज्ञानबातुकाराम।। हा गजर ऐकू येत असतो. त्या निनादणाऱ्या गगनाच्या गाभाऱ्यात जणू भगवंत प्रगट होतो. टाळकऱ्यांच्या या आनंदकल्लोळात विठुराया नाचू लागतो.
– उमेश बागडे