मल्हारीरायाचा येळकोट करत

पालखी सोहळा जेजुरीत दाखल

जेजुरी : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’,’ माऊली माऊली’ अशा जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, भंडार-खोबऱ्याची उधळण करत आज (दि. १६) सायंकाळी ५ वाजता श्री खंडेरायाच्या जेजुरी नगरीच्या वेशीवर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो वारकरी मल्हारीरायाच्या पिवळ्या भंडाऱ्यात न्हाऊन निघाले. शैव-वैष्णवांचा अनोखा संगम यानिमित्ताने अनुभवण्यास मिळाला.
wig shop
wig stores
cheap wigs for sale
cheap wigs
cheap lace front wigs
best human hair wigs
real hair wig
cheap human hair wigs
best wigs for white women
wig stores
best wigs on amazon
cheap wigs
short blonde wig
black women wigs
cheap lace front wigs
wig outlet
cheap wigs
black hair wig
best human hair wigs
online wig store
best human hair wigs online
cheap wigs for sale
lace front wigs
cheap wig
cheap wigs
best human hair wigs online
womens real hair wigs
wigs sale
wig types
wig sale
best wigs for black women
human hair lace front wigs
wholesale wigs
wig shop
headband wig
wig sales
human hair wigs for women
wigs sale
wig shops
luvme glueless wigs
wigs online

दोन दिवस सासवडच्या पालखी तळावर मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पादुकांना पहाटे अभिषेक, धुपारती झाल्यानंतर सोहळा सकाळीच जेजुरीकडे मार्गस्थ झाला. बोरवके मळा येथे सकाळची न्याहरी झाली. तसेच यमाई शिवरी येथे विश्रांती झाली. सोहळ्याच्या वतीने यावेळी श्री यमाई मातेची पूजा करण्यात आली. त्यानंतर वाटचालीत साकुर्डे फाटा येथे थोडा वेळ विश्रांती झाली.

रणरणत्या उन्हात वाटचाल करत सायंकाळी ५ वाजता सोहळा जेजुरीच्या वेशीवर पोहोचला. जेजुरी नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, गटनेते सचिन सोनवणे आदिंनी सोहळ्याचे स्वागत केले. जेजुरीकरांनी यावेळी माऊलींच्या पालखीवर मुक्त हस्ताने भंडाऱ्याची उधळण केली.

‘हरी-हर भेद नका करू’ असे सांगत सर्वच वारकरी संतांनी शैव-वैष्णव ऐक्याचा पुरस्कार केला. त्यासंबंधी साहित्य रचनाही केल्या. त्यापैकी ‘अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी॥’ हा संत एकनाथांचा अभंग गात वारकऱ्यांनीही भंडाऱ्याची उधळण केली. अनेक दिंड्यांमधून वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात नाथबाबांची भारूडे, पदे, गौळणी म्हणण्यात दंग झाले होते. तसेच महिला वारकरी खंडोबाची पारंपारीक गीतेही गात होत्या.

पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी आपले कुलदैवत असणाऱ्या मल्हारीरायाच्या दर्शनासाठी गडावर दर्शनासाठी गर्दी केली होती. मार्तंड देव संस्थानाच्या वतीने पालखी मार्गावरील मुख्य शिवाजी चौकात मोठ्या स्क्रीनवर खंडोबारायाच्या गाभाऱ्यातील दर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत होते. देवाच्या प्रसाद वाटप ही करण्यात येत होते.

विश्वस्तांतर्फे वारकऱ्यांनी फूड पाकिटे देण्यात येत होती. तसेच जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. सासवड ते जेजुरी दरम्यान वारीच्या वाटेवर ठिकठिकाणी वारकऱ्यांना खाऊ वाटप करण्यात येत होते. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून आरोग्य सुविधा पुरवण्यात येत होत्या.

जेजुरीच्या पश्चिमेला नव्याने निर्माण करण्यात येत असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर तलावाकाठच्या तळावर सोहळा पोहोचला. तिथे सायंकाळी सहा वाजता समाज आरती झाली. उद्या सकाळी सहा वाजता सोहळा वाल्हे मुक्कामी मार्गस्थ होणार आहे. दुसरीकडे यवतकरांचा निरोप घेऊन संत तुकाराम महाराजांची पालखी दौंड तालुक्यातील वरवंड येथे दाखल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *