पादुकांना नीरास्नान घालून

पालखी विसावली लोणंदमध्ये

लोणंद : महर्षी वाल्मिकींच्या वाल्हे नगरीचा निरोप घेऊन संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज (दि. १८) सातारा जिल्ह्यातील लोणंद गावी मुक्कामी पोहोचला. दरम्यान, जिल्ह्यात प्रवेश करताना दुपारी नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यावेळी ‘माऊली माऊली’च्या गजराने नीरा नदीतीर दुमदुमून गेला.
custom mlb jerseys
custom nfl jersey
custom jersey
custom softball jerseys
custom team jerseys
design jerseys online
custom basketball jersey
custom apparel
custom nfl jerseys
customize football jersey
custom design jerseys
custom baseball jerseys
custom soccer jersey
custom jersey maker football
custom jerseys football
personalized jerseys
custom baseball jersey
custom team jerseys
custom uniforms
custom basketball uniforms
custom jersey maker baseball
custom basketball jerseys cheap
football jersey online
custom jerseys
best nfl custom jersey
custom nba jerseys
custom jerseys football
cheap football jerseys
custom hockey jerseys
custom baseball jerseys
customized jerseys
custom football jersey
custom hoodies for men
custom jerseys soccer
custom basketball jerseys
custom nfl jersey china
custom apparel
custom team jerseys
custom jerseys near me
cheap soccer jerseys
custom nba jerseys

वाल्हे मुक्कामाहून निघालेला पालखी सोहळा सकाळी आठ वाजता पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसाव्यासाठी थांबला. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता सोहळा नीरेमध्ये दाखल झाला.

तेथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर माऊलींची पालखी नीरा नदीच्या काठावर सजविलेल्या विसाव्याच्या ठिकाणी ठेवण्यात आली. माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नीरा आणि परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

दुपारी दीडच्या सुमारास नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकलीन पुलावरून माऊलींची पालखी नीरा स्नानासाठी निघाली. पूर्वी नीरा नदीवर पूल नव्हता. तेव्हा माऊलींची पालखी शिरवळमार्गे लोणंदला जात असे. परंतु नीरा नदीवर वाल्ह्याचे अभियंता कृष्णराव मांडके यांनी त्याकाळी श्रद्धेपोटी पूल बांधला. अजूनही तो जुना पूल म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या मांडके घराण्याला माऊलींच्या पालखीला पंखा हलविण्याचा मान दिला गेला आहे.

पलिकडे रथ पोहोचल्यावर पालखीतील माऊलींच्या पादुका सोहळ्याचे मालक राजाभाऊ पवार-आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या. आरफळकरांसह सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश देसाई यांसह सोहळ्यातील मानकऱ्यांनी माऊलींच्या पादुका दत्त घाटावर आणल्या. ‘माऊली माऊली’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना पवित्र नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी नदीकाठी एकच गर्दी केली होती.

माऊलींच्या पादुका स्नानानंतर सोहळ्याने लोणंद मुक्कामाकडे वाटचाल सुरू केली. त्यापूर्वी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, प्रशासन अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याला निरोप दिला, तसेच सातारा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी सोहळ्याचे स्वागत केले. सायंकाळी सहाच्या सुमारास सोहळा लोणंद मुक्कामी पोहोचला. नगरपंचायत आणि नागरिकांच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

लोणंद मुक्कामाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी पालखीचा अडीच दिवस मुक्काम असतो. पालखी गावात येणे हाच गावाचा मुख्य वार्षिक उत्सव असतो. या दोन दिवसांत लेकीबाळी माहेरी येतात. माऊलींना बँड लावून वाजतगाजत नैवद्य आणला जातो. प्रत्येक घरात वारकरी जेवू घातले जातात. गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, येथील मुस्लीम बांधव पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी होतात.

बऱ्याचदा पालखी गावात आली असताना बकरी ईद आल्यास ईद पुढे ढकलली जाते. लोणंदमधून अडीच दिवसांचा पाहुणचार घेऊन माऊलींचा पालखी सोहळा २० जून रोजी तरडगावला पोहोचणार आहे. याच प्रवासात माऊलींच्या सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार आहे.

दुसरीकडे आज उंडवडी येथून सकाळी निघालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बऱ्हाणपूर, मोरेवाडी येथे विसावा घेत संध्याकाळी बारामतीत शहरात दाखल झाला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सपत्नीक पालखी सोहळ्याचे बारामतीच्या वेशीवर स्वागत केले. अजित पवार यांनी पालखीचे सारथ्यही केले. नगरपालिकेच्या वतीने पालखीतील सर्व वीणेकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *