पालखी सोहळ्याच्या शिस्तीला
गालबोट लावणारी घडली घटना
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज (दि. १०) सायंकाळी पाचच्या सुमारास प्रस्थान झाले. या सोहळ्यासाठी मंदिरात प्रवेश करू पाहणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आहे. या घटनेचा वारकऱ्यांकडून तसेच विरोधी पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे.
adidas shoes on sale
adidas yeezy boost 350 v2
adidas yeezy 700 v3
cheap adidas shoes
adidas yeezys boost 350
adidas ultraboost shoes
adidas slides yeezy
adidas yeezy 350 boost v2 zebra
adidas outlet store
outlet adidas
yeezy adidas
adidas shoe on sale
adidas yeezy 450
adidas and yeezy
adidas yeezy shoes
outlet adidas
adidas shoe on sale
yeezy adidas
adidas yeezy boost 350
adidas yeezy 700 v3 azael
adidas stores
adidas yeezy men
adidas yeezy slides bone
adidas yeezy slides
adidas shoes for sale
adidas 350
adidas yeezy men
adidas yeezy foam runner mens
adidas outlet orlando
adidas yeezy 350
adidas yeezy sneakers
adidas yezzy boost
adidas outlet
yeezy adidas
adidas for sale
adidas outlet store sunrise
adidas yeezy boost 350
sales on adidas shoes
women’s adidas sneakers on sale
adidas yeezy slide onyx
adidas outletपंढरीला जाणारे संतांचे पालखी सोहळे स्वयंशिस्त पाळतात. प्रस्थान ते पंढरपूर यादरम्यान वारकरी पूर्णपणे शिस्तीत वाटचाल करतात. अगदी पोलिसांनाही गर्दी नियंत्रणाचा वगैरे ताण येत नाही. मात्र यंदा माऊलींच्या मंदिराच्या महाद्वारावरच मंदिरात प्रवेश करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
कारण गर्दी नियंत्रित करण्यासाठी म्हणून या वर्षी ४७ दिंड्यांमधील केवळ ७५ वारकऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जात होता. त्याच वेळी अनेक वारकरी आम्हाला मंदिरात प्रवेश द्यावा, म्हणून पोलिसांकडे आग्रह धरत होते. शेवटी महाद्वाराजवळ वारकऱ्यांची संख्या वाढल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वारकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली.
सरकारचा निषेध : अजित पवार
दुसरीकडे समाजमाध्यमांवर लाठीमाराचे वृत्त पसरताच विरोधी पक्षांनी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी आळंदीहून प्रस्थान सोहळ्याच्या वेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलिस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलिस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो’, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांना निलंबित करा : नाना पटोले
तर ‘आळंदीत आज वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा. वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या मुजोर पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
हेच पाहायचे उरले होते : संजय राऊत
‘म्हणे हिंदुत्ववादी सरकार. वारकऱ्यांनी आज पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. उद्या बंदुकांचा सामना करावा लागेल. हेच पाहायचे उरले होते..तीर्थ पर्यटन करणारे मुख्यमंत्री कोठे आहेत? हिंदू आक्रोश मोर्चा काढणारे कोठे आहेत?’ असा सवाल शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
केवळ किरकोळ झटापट : पोलिस आयुक्त
ठरल्याप्रमाणे पालखी प्रस्थान सोहळ्यात प्रत्येक मानाच्या दिंडीतील ७५ जणांना प्रवेश देण्यात आला. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही.’ असे पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी म्हटले आहे.
अशाच प्रकारे १९७७मध्ये प्रस्थान सोहळ्याच्या वेळी माऊलींच्या मंदिराच्या महाद्वारात वारकऱ्यांवर लाठीमार झाला होता. त्यावेळी दलित दिंड्यांना मुख्य सोहळ्यापासून दूर ठेऊ नये, अशी मागणी करत महाद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनाचे नेतृत्त्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव करत होते. त्यांनाही अंगावर लाठ्या झेलाव्या लागल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते.