पिराची कुरोली येथील शिल्पाचे
डहाके, सासणेंच्या हस्ते लोकार्पण
पटवर्धन कुरोली : भाषा ही जोडण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नव्हे. कोणतीही भाषा परकी नसते. शब्दरूप विठ्ठलाच्या माध्यमातून आम्ही सगळे एकच आहोत, असा संदेश दिला गेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी येथे केले.
पंढरपूर-पुणे या पालखी मार्गावर चिंचणी येथे आत्मभान ट्रस्टतर्फे विठ्ठलाचे शब्दशिल्प उभारण्यात आले आहे. या शब्दशिल्पाचे लोकार्पण शनिवारी (दि. २ जुलै) डहाके आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डहाके यांनी हे विचार व्यक्त केले.
यावेळी या प्रकल्पाचे संकल्पक आणि आत्मभान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश भंडारे, सिध्दार्थ ढवळे, मोहन अनपट, प्रमोद मुजुमदार, निशा साळगावकर, श्री. बंगाळे, शिवाजी बागल, बाळासाहेब काळे, तुकाराम कोलगे आदी उपस्थित होते.
यावेळी डहाके पुढे म्हणाले की, आपण सगळे एक आहोत, हाच विठ्ठलाचा संदेश आहे. तो संदेश संतानी आपल्या साहित्यातून सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. विठोबा वेगवेगळ्या प्रांतातील लोकांना आपल्याकडे खेचून आणतो आणि त्यांचे ऐक्य करतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले. आभार शशिकांत सावंत यांनी मानले.