सोलापूरकरांकडून उत्साही स्वागत;
आज पालखी नातेपुतेमध्ये मुक्कामी
नातेपुते : सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामानंतर आज (दि. २३) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने श्री विठुरायाच्या जिल्ह्यात अर्थात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे सकाळी ११ वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
custom mens softball jerseys
custom bowling jerseys
custom jerseys basketball
custom soccer jersey
custom basketball jersey
custom baseball jersey
custom jerseys basketball
custom softball jerseys
custom baseball uniforms
custom basketball uniforms
customize football jersey
custom jerseys
custom nba jerseys
nike custom baseball jerseys
custom jerseys basketball
custom team jerseys
football jerseys
customized baseball jerseys
custom jerseys near me
custom team jerseys
nfl jersey for sale
customize jersey
customized baseball jerseys
hockey jersey customizer
custom basketball jerseys
nba jersey customized
team jerseys
baseball jerseys custom
custom football jersey design online
customized shirts near me
custom baseball jerseys
make your own jersey
custom jerseys
custom jersey maker
custom nfl jerseys
create custom jerseys
custom soccer jerseys
custom basketball jerseys cheap
custom baseball jersey
custom mlb jerseys
customized printed jerseys
पालखीच्या स्वागतासाठी सोलापूरकारांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, प्र. कुलगुरु रजनीश कामत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विखे पाटील यांनी माऊलींच्या पालखी रथाचे सारथ्य केले. पालखीच्या स्वागतापूर्वी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोहळ्यातील अश्वांचे पूजन करण्यात आले. पालखीच्या स्वागतानंतर प्रशासन अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी वारकाऱ्यांसोबत काही अंतर वाटचालही केली.
बरड मुक्कामाहून सोहळा सकाळी साडेसहा वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. पहाटे श्री ज्ञानेश्वर माऊलींची पूजा आणि आरती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्यासह भाविक उपस्थित होते.
सकाळच्या अल्हाददायक वातावरणात सोहळा पावणे नऊ वाजता पहिल्या विसाव्यासाठी साधुबुवाचा ओढा येथे पोहोचला. साधुबुवा हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत होते. वारीच्या वाटेवर राजुरी येथील ओढ्यावर त्यांनी आपला देह ठेवला. तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली. दरवर्षी माऊलींची पालखी साधुबुवांच्या मंदिरात नेण्यात येते. माऊलींच्या पादुका साधुबुवांच्या समाधीवर ठेवण्यात येतात. सकाळच्या न्याहरीनंतर सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला. धर्मपुरी येथे पालखी येण्यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. यात आरोग्यशिक्षण, पर्यावरण रक्षण, स्वच्छता आदी विषयांचा समावेश होता. यावेळी पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
बरड ते नातेपुते वाटचालीत सोहळ्याच्या उजव्या बाजूला शंभू महादेवाचा डोंगर लागतो. या शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी जातात आणि दर्शन करुन शिंगणापूर फाटा येथे सोहळ्यात पुन्हा सहभागी होतात. शिखर शिंगणापूरच्या डोंगरापासून पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांमध्ये
शिव भोळा चक्रवर्ती। त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम। तया न बाधी क्रोधकाम॥
असे अभंग गायले जात होते. यंदा पंढरपूर जवळ आले तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे वाटचाल करणाऱ्या शेतकरी-वारकरी चिंतातूर आहेत. पावसासाठी ते मनोमन देवाची आळवणी करत आहेत. दरम्यान, माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात आज पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली आहे.
शिंगणापूर फाटा येथे सायंकाळचा विसावा घेऊन सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी साडेपाच वाजता नातेपुते हद्दीत नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मुख्याधिकारी माधव खांडेकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्यासह नगरवासीयांनी सोहळ्याचे स्वागत केले. सायंकाळी सहा वाजता सोहळा पालखी तळावर पोहोचला. सायंकाळी साडेसहाला समाजआरती होऊन सोहळा नातेपुते मुक्कामी विसावला.
यंदा नातेपुते येथील तळाची जागा अपुरी आहे. त्यामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार वारकरी करत आहेत. वारकरी फडकरी दिंडी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जळगावकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने सासवड ते वाखरी दरम्यान मुक्कामासाठी २५ एकर जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील वाटचालीत भाविकांना रिंगण सोहळ्यांचा आनंद लुटता येणार आहे. माळशिरस तालुक्यात सदाशिवनगर (पुरंदावडे हद्द), खुडूस फाटा आणि ठाकुरबुवा (उघडेवाडी) येथे तसेच पंढरपूर तालुक्यात बाजीराव विहीर (वाखरी) येथे गोल रिंगण होते. तर बाजीराव विहीर (वाखरी) आणि इसबावी (पंढरपूर) येथे दोन उभी रिंगणे होतात. या रिंगण सोहळ्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. त्यामुळे जिल्हा प्रशानाने हा रिंगण सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
(फोटो : रविराज वाणी, माळशिरस)