जिल्ह्यात पालख्यांचे मुक्काम
होणार पाच ठिकाणांवर
सातारा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. १८ जून ते दि. २३ जून २०२३ या कालावधीत सातारा जिल्ह्यामधून मार्गक्रमण करणार आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी सर्व सुविधांसह प्रशासन सज्ज झाले आहे. त्याबाबतचे नियोजन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जयवंशी यांनी सातारा जिल्ह्यातील निरा नदी ते साधुबुवाचा ओढा हा पालखी मार्ग, मार्गावरील विसावा, दुपारचे भोजन स्थळ, पालखी तळ यांची नुकतीच पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाचे संजय कदम आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
custom jerseys
nfl football fantasy
nfl shop
custom nfl jersey
custom nfl jersey
nfl fantasy football
cheap nfl jerseys
best nfl uniforms
nfl shop coupon code
official nfl shop
nfl pro shop
nfl football
nfl com shop
nfl shops
nfl fantasy football
nfl shop steelers
nfl custom jersey
nfl stores
nfl fan shop
cowboys jersey for sale
shop nfl jerseys
nfl fantasy
nfl jerseys
custom jersey
chicago bears
nfl super bowl
custom jerseys
cheap jerseys nfl
cheap nfl jerseys
new york nfl teams
nfl fantasy jersey
nflshop
nfl shop coupon code
nfl superbowl winners
nfl shop customer service
nfl jersey for sale
Bengals jerseys
cowboys football
cheap nfl football jerseys
best nfl jersey
best nfl jerseys
यावेळी जयवंशी म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, वीज, रस्ते, अग्निशमन पथक, आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात. पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी खंडाळा आणि फलटण तालुक्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी. पालखी स्वागताची तयारी चांगल्या प्रकारे करावी.
शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात यावे. त्याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. दवाखान्यांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने महामार्गावर असलेले अडथळे त्वरित काढावे तसेच सर्व यंत्रणांनी पालखी सोहळ्याचे चांगल्यापद्धतीने नियोजन करावे, अशा सूचनाही तजिल्हाधिकारी यांनी दिल्या. यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप आणि वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी पालखी सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाविषयीची माहिती दिली.
फलटण तालुक्यात तीन मुक्काम
यावर्षी सातारा जिल्ह्यात एकूण पाच मुक्काम असणार आहेत. यावर्षी लोणंदमध्ये दोन, तर फलटण तालुक्यात तीन मुक्काम होणार आहेत, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार यांनी दिली. सातारा जिल्ह्यात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात पाच दिवस मुक्कामाला असल्यामुळे लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे भक्तांचा मेळा पाहण्यास मिळणार आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा संस्थेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार रविवार, दि. १८ जून २०२३ रोजी पालखी सोहळा नीरा स्नान आणि आरती होईल. त्यानंतर सातारा जिल्ह्यात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होईल. पाडेगाव येथे सातारा जिल्ह्याच्या वतीने स्वागत केल्यानंतर रात्री लोणंद येथे हा सोहळा मुक्कामी राहील. दुसऱ्या दिवशी सोमवार, दि. १९ जून रोजी पालखी लोणंद येथेच मुक्कामी असणार आहे.
लोणंद येथील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर मंगळवार, दि. २० जून रोजी पालखी सोहळा तरडगाव (ता. फलटण) येथे मुक्कामाला प्रस्थान करेल. दुपारी चारच्या दरम्यान दिवशी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल. त्यानंतर तरडगाव येथे ज्ञानेश्वर पालखीचा मुक्काम राहील. बुधवार, दि. २१ जून रोजी पहाटे पाच वाजता फलटणकडे प्रस्थान करेल. दत्त मंदिर काळज, सुरवडी, निंभोरे ओढा, वडजल येथे विसाव्यासाठी पालखी काही वेळ थांबेल. त्यानंतर सायंकाळी सोहळा पालखी फलटण विमानतळावर मुक्कामी असेल.
दि. २२ जून रोजी पालखी सोहळा बरडला प्रस्थान करेल. या मार्गावर विडणी, पिंपरद, निंबळक फाटा येथे विसावा घेतल्यानंतर तो बरडकडे मुक्कामासाठी मार्गस्थ होईल. बरड मुक्कामानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान करेल. साधूबुवाचा ओढा येथे दुपारचा विसावा झाल्यानंतर बरडच्या सीमेवर धर्मपुरीजवळ पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागत केल्यानंतर पालखी सोहळ्याचा कारुंडेकडे प्रस्थान करेल.