उन्हापासून संरक्षण करण्यासाठी

पुणे जिल्हा परिषदेकडून सुविधा

पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून पुणे जिल्हा प्रशासनातर्फे २७ ठिकाणी मंडप उभारण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेने त्यासाठी ठिकाणे निश्चित केल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी दिली आहे.

येत्या १२ जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होणार आहे. १२ आणि १३ जून रोजी शहरात या पालख्यांचा मुक्काम असेल. पुणे जिल्ह्यात एकूण १८ ठिकाणी पालख्यांचा मुक्काम असणार आहे. या काळात उन्हाच्या झळांचा त्रास होऊ नये म्हणून, प्रशासनातर्फे पालखी मार्गावर २७ ठिकाणी मंडप उभारण्यात येणार आहेत.
custom nfl jersey
cheap jerseys
custom nfl jerseys
nfl shop coupon
best nfl jerseys of all time
best nfl uniforms
New England Patriots
nfl gear
nfl jersey sales
nfl apparel
dallas cowboys football
custom jersey
nfl shop.com
nfl jerseys
nfl jerseys for sale
nfl patriots
nfl san francisco 49ers
free shipping nfl shop
custom jersey
dallas cowboys football
nfl football
custom jerseys
buffalo bills apparel
nfl football
nfl jerseys online
custom football jerseys
cheap jerseys
custom nfl jersey
cheap nfl jerseys
nflshop
custom nfl jerseys
cheap nfl jerseys
custom jerseys
nfl shop custom jersey
nfl pittsburgh steelers
nflstore
cheap jerseys nfl
cheap sports jerseys
nfl fantasy football
nfl jersey shop
nfl shop

आषाढी वारीतील लाखो वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. पालखीमार्गात ठिकठिकाणी उन्हापासून संरक्षण देण्यासाठी मंडप घालणे हा त्यातीलच एक उपक्रम आहे. या ठिकाणांचे सपाटीकरण, साफसफाईची कामे केली जाणार असल्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी स्पष्ट केले. सीएसआरच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून हा मंडप उभारणीचा खर्च केला जाणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावर चार ठिकाणी, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावर १२ ठिकाणी मंडप असणार आहेत. तसेच श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा मार्गावर ११ ठिकाणी मंडप उभारण्यात येणार आहेत. विसावा आणि मुक्काम या दोन्ही ठिकाणांच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला हे मंडप असणार आहेत. उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना मार्गावर मंडप उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने मंडप उभारण्याची ठिकाणे ठरवत आहेत.

यासोबतच पालखीसाठी लागणाऱ्या इतर सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. या काळात आरोग्यासाठी ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. आरोग्य सेवेसाठी २० लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान दिंडीप्रमुखांना ७४० औषध किटचे वाटप करण्यात येणार आहे. पालखी मुक्कामांच्या ठिकाणी तीन दिवस आधी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या पथकाकडून पाच किलोमीटर परिसरात कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी धूरफवारणी केली जाणार आहे. पालखी मार्गावरील खासगी रुग्णालयांमधील १० टक्के खाटा वारकऱ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. दोन्ही पालख्यांसमवेत आरोग्य चित्ररथ असणार आहे तसेच सर्व आरोग्य पथकांच्या ठिकाणी मोठे बोर्ड, बॅनर आणि फ्लेक्समार्फत आरोग्य योजनाची जनजागृती केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *