चांदोबाचा लिंब येथे रिंगण;

सोहळा तरडगाव मुक्कामी

लोणंद : निरभ्र आभाळात फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर, दोन ओळींमध्ये उभे राहिलेले हजारो वारकरी आणि त्यांच्या डोळ्यांत दाटलेली उत्कंठा, अशा वातावरणात चोपदारांच्या हातातील दंड उंचावला जातो आणि ‘माऊली माऊली’च्या गजरासोबत दोन डौलदार अश्व धावत येतात… अश्व पुढे गेल्यावर त्यांच्या टापांखालची माती घेण्यासाठी एकच गर्दी उसळते. पंढरीला निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज (दि. २०) दुपारी चांदोबाचा लिंब या ठिकाणी हजारो डोळ्यांनी अनुभवले.
cheap jerseys for sale
customized baseball jerseys
custom basketball jerseys
custom soccer jerseys
custom football jerseys
baseball jerseys custom
custom nfl jersey
custom jersey maker hockey
custom team jerseys
nfl custom jersey
custom basketball jersey
Custom Football Jerseys
custom hoodies near me
customize jersey baseball
custom jerseys
custom baseball jersey
nba jersey sale
basketball jerseys
nfl custom jersey
custom jerseys baseball
custom football jersey
custom jerseys basketball
customized basketball
custom football jerseys
custom hockey jerseys
custom nba jerseys
custom baseball jerseys
custom team jerseys basketball
custom design jerseys
customized baseball jerseys
custom baseball jerseys
best custom nfl jerseys
personalized jerseys
custom team jerseys baseball
custom bowling jerseys
soccer jerseys custom
custom nba jerseys
nbashop
soccer jerseys
jerseys for sale
custom jerseys football

रिंगणाचा हा सोहळा अनुभवण्यापूर्वी माऊलींच्या पालखी सोहळ्याने भल्या सकाळी लोणंद येथील अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर मंगळवारी (दि. २०) तरडगाव मुक्कामाच्या दिशेने कूच केले. त्यापूर्वी पहाटे संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते माऊलींची महापूजा करण्यात आली. दुपारी दोन वाजता कापडगाव येथे सोहळ्याचे फलटण तालुक्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. आमदार दिपक चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार अभिजीत जाधव, उपविभागीय पोलिस उपअधिक्षक राहुल धस आदी यावेळी उपस्थित होते.

त्यानंतर माऊलींची पालखी तरडगाव पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या चांदोबाचा लिंब या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणच्या मंदिराला रंगरंगोटी केली होती, तसेच फुलांची सजावट केली होती. याच ठिकाणी चोपदारांनी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण लावून घेतले. त्यांनी सोहळ्यातील सर्व दिंड्यातील वारकऱ्यांना रस्त्याच्या मध्ये एकमेकांसमोर दोन रांगांमध्ये उभे केले. माऊलींच्या पालखीसोबत दोन अश्व आहेत. त्यापैकी एकावर स्वतः माऊली बसलेले असतात, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. तर दुसऱ्या अश्वावर शितोळे सरकारांचा स्वार पताका घेऊन बसलेला होता.

सर्व सज्जता झाल्यावर चोपदारांनी दंड उंचावून रिंगण सुरू करण्याचा इशारा केला. त्याबरोबर दोन्हीही अश्व टाळमृदंगाच्या गजरात आणि ‘माऊली माऊली’च्या जयघोषात वेगाने धावत वारकऱ्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या मानवी साखळीतील शेवटच्या दिंडीपर्यंत पोहोचले आणि पुन्हा त्याच वेगाने परत माऊलींच्या रथापर्यंत पोहचले.

दरम्यान, अश्वांच्या टापांखालची पवित्र माती घेण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर अश्व गेलेल्या जागेवर फुगड्या घालत, उंच उड्या मारत वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्याचा आनंद साजरा केला. रथापुढे आल्यानंतर सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी दोन्हीही अश्वांना पेढ्यांचा प्रसाद भरवला. त्यानंतर चोपदारांनी चोप उंचावत रिंगण सोहळा पार पाडल्याची सूचना दिली.

रिंगण सोहळा पाहण्यासाठी लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगाव, पर्‍हार खुर्द, हिंगणगाव, राहुडी, माळेवाडी, शिंदेमळा आदि गांवातील भाविकांनी गर्दी केली होती. सातारा जिल्हा परिषदेने वारकरी, भाविकांसाठी पाण्याचे टँकर उभे केले होते. रिंगणानंतर सोहळा तरडगाव मुक्कामी मार्गस्थ झाला. सायंकाळी सहा वाजता सोहळा तरडगाव येथे पोहोचला. गावकऱ्यांनी सोहळ्याचे स्वागत केले. तरडगावात सोहळ्याचा एक दिवस मुक्काम आहे. उद्या (दि. २१) सोहळा फलटण मुक्कामाची वाट चालू लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *