माऊलींचे गोल रिंगण पुरंदवडे येथे;
तुकोबारायांचे रिंगण अकलूजमध्ये
अकलूज : तळपणाऱ्या उन्हाच्या झळा झेलत, घामांच्या धारांनी भिजत, पावसाची चिंता करत पंढरीची वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांवर आज (दि. २४) वरुणराजाने सुखद वर्षाव केला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुरंदवडे येथील पहिल्या गोल रिंगण सोहळ्यात हजेरी लावून पावसाने वारकऱ्यांचा आनंद द्विगुणीत केला. दुसरीकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे भव्य गोल रिंगण अकलूज येथे पार पडले.
make custom jerseys
custom baseball jerseys cheap
custom jerseys baseball
custom uniforms
custom hockey jerseys
custom volleyball jerseys
nba jersey customized
custom jerseys basketball
football jersey custom
china cheap jerseys custom
best custom jerseys
custom basketball jerseys
customize football jersey online
custom football jersey
customized baseball jerseys
custom jerseys
nba jersey customized
custom baseball jerseys
custom football
custom baseball jerseys
custom soccer jerseys
custom football jerseys
custom soccer uniforms
custom basketball uniforms
custom basketball jersey
custom football jersey
custom dodgers jersey
custom apparel
football jersey maker online
customized basketball
custom hockey jersey
custom jerseys near me
custom jerseys football
custom jerseys
custom jerseys nfl
nfl custom jersey
custom jerseys baseball
custom nfl jersey
custom design soccer jerseys online
cheap custom jerseys
customized baseball jerseys
नातेपुते मुक्कामी सायंकाळी पावसाने सोहळ्यावर हलकासा शिडकावा केला होता. त्यामुळे पुढील वाटचालीत पावसाची सोबत मिळणार या कल्पनेनेच वारकरी हरखून गेले होते. पहाटेच ढगाळ वातावरणात सोहळ्याची वाटचाल सुरू झाली. सकाळी नऊ वाजता सोहळा मांडवे ओढा येथे विसाव्याच्या ठिकाणी पोहोचला. सकाळी ११ वाजता सोहळा पुरंदवडेकडे मार्गस्थ झाला.
पुरंदवडे येथे सोहळ्यातील पहिल्या रिंगणाची तयारी करण्यात आली. माऊलींची पालखी रिंगणाच्या मध्यभागी पोहोचताच माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील आणि उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी माऊलींच्या पादुकांची पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आणि मान्यवरांनी दर्शन घेतल्यानंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. त्याच वेळी वारी सुरू झाल्यापासून गायब झालेल्या पर्जन्यराजाने रिंगण सोहळ्यात हजेरी लावत माऊली आणि वारकऱ्यांवर जलाभिषेक केला.
पावसाच्या सरी अंगावर झेलतच मोती या माऊलींच्या आणि हिरा या स्वाराच्या अश्वाने दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. पर्जन्यराजाचे आगमन आणि अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला. या उत्साहातच रिंगणानंतरचा उडीचा कार्यक्रम आनंदात पार पडला. येळीव येथील अल्पशा विश्रांतीनंतर सोहळा पडणाऱ्या पावसातच माळशिरस मुक्कामी पोहोचला. उद्या माऊलींच्या पालखीचे खडूस येथे दुसरे गोल रिंगण होऊन सोहळा वेळापूर येथे मुक्कामी पोहोचेल.
दुसरीकडे जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नीरा नदी ओलांडून सकाळी माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकांचे पूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाने भक्तीमय वातावरणात पालखीला निरोप दिला. अकलूज येथे पालखीचे स्वागत फुले उधळून आणि रांगोळ्यांच्या पायघड्या घालून करण्यात आले, येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण पार पडले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी जमले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करुन अश्व रिंगणी धावले. लाखों वारकरी, भाविक हा नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहून तृप्त झाले. संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज येथून निघून माळीनगर येथे उभे रिंगण झाल्यावर बोरगाव मुक्कामी विसावणार आहे.