पालखी सोहळ्यामध्ये सहभागी
होण्याचे ‘समता दिंडी’चे आवाहन
पुणे : सर्व संतांनी समतेचा विचार सांगितला. भारतीय संविधानातील मूल्ये याच विचारांतून निर्माण झाली. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाने ‘एक दिवस तरी, वारी अनुभवावी’ या उपक्रमात सामील व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात उद्या (दि. १८) गवळ्याची उंडवडी ते बऱ्हाणपूर असे अंतर या उपक्रमात वाटचाल होणार आहे.
custom hoodies
custom jersey basketball
cheap basketball jerseys
custom football jerseys
design jersey
custom hockey jersey
cheap baseball jerseys
custom designs
customize jersey
custom soccer jerseys
nfl custom jersey coupon
custom football jersey
custom jerseys basketball
custom nba jerseys
custom clothing
custom nfl jerseys
customized basketball
custom football jerseys
custom design
custom nba jerseys
custom basketball
custom basketball
cheap nfl custom jersey
make custom hoodies
custom jerseys baseball
custom jerseys basketball
custom football uniforms
custom jerseys football
custom team uniforms
custom jersey maker basketball
design your own sports jersey
custom design jersey online
custom basketball jerseys
customize jersey football
cheap nba jerseys
custom jersey online
custom jerseys basketball
design jerseys
nfl jersey for sale
custom basketball jerseys
design your own jersey
गेली १० वर्षे हा ‘एक दिवस तरी, वारी अनुभवावी’ हा उपक्रम सुरू आहे. गेल्या ५ वर्षांपासून या उपक्रमाला पूरक असणारी ‘संविधान समता दिंडी’ सुरू करण्यात आली. ही दिंडी तुकोबारायांच्या पालखीसोबत पंढरपूरला जाते. या दिंडीचे प्रस्थान मंगळवारी (दि. १३) संध्याकाळी पुण्यातील महात्मा जोतिबा फुले यांच्या गंजपेठेतील वाड्यातून झाले.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार म्हणाले, सत्याचा असत्याशी, नितीचा अनितीशी, प्रेमाचा द्वेषाशी संघर्ष म्हणजे धर्मयुध्द. धर्मयुध्द हे दोन धर्मीयांमध्ये असते असे हल्ली समजले जाते. मग रामायण, महाभारत यातील युद्धालाही धर्मयुध्द म्हटले जाते. तिथे कोणते दोन धर्म होते? दोन्ही युद्धातील प्रतिस्पर्धी हिंदूच होते. मग ते धर्मयुध्द नव्हते का? तर होते. ते युद्ध कोणत्या धर्माचे कोणत्या धर्मा विरोधात होते? तर ते होते सत्य विरुद्ध असत्य, निती विरुद्ध अनिती, प्रेम विरुद्ध द्वेष. आज आपल्याला धर्मयुध्द करायचेच असेल, तर ते असत्य, अनिती आणि व्देषाविरोधात केले पाहिजे.
तरुण विचारवंत पैगंबर शेख म्हणाले, सर्वांनी स्विकारलेला विचार जो मानत नाही तो काफिर असतो. आज संविधान सर्वांनी मान्य केले आहे. म्हणून आजच्या काळात जो संविधान मानत नाही तो खुशाल काफिर समजावा.
ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी उपस्थित महिलांना शिक्षणाचे महत्व ओव्या आणि अभंगांमधून समजावून दिले. तसेच संविधानामुळेच सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला असल्याचे स्पष्ट करत संविधानाचे महत्व सांगितले.
सुभाष वारे म्हणाले, ‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे’ या अभंगाप्रमाणे कुठल्याही एका समाजाला लक्ष्य करून त्या समाजाविरुध्द द्वेष पसरवणे हे संतविचारांमध्ये बसत नाही.
काँग्रेसचे नेते अभय छाजेड यांनी यावेळी संतविचारांची व्यापकता मांडत संविधान समता दिंडीला शुभेच्छा दिल्या. संविधान समता दिंडीचे चालक आणि पुरोगामी कीर्तनकार ह. भ. प. शामसुंदर सोन्नर महाराजांनी संतविचार आणि संविधान विचारांची परस्परपूरकता यावर उपस्थितांशी संवाद साधला. शाहिर शीतल साठे आणि शाहीर सचिन माळी यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. राजवैभव यांनी प्रास्ताविक केले तर साधना शिंदे यांनी आभार मानले. सरस्वती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या उपक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे-
- रविवार दि. १८ जून २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ – गवळ्याची उंडवडी ते बऱ्हाणपूर – वाजेपर्यंत पायी वारी. (तुकोबारायांच्या पालखीमागील
संविधान समता दिंडीत सहभाग) - दुपारी १ – दिंडी बऱ्हाणपूर येथे पोहोचणार
- दुपारी २ – संविधान समता दिंडीचे भैरवनाथ मंदिर बुऱ्हाणपूर, (ता. बारामती) येथे स्वागत
- दुपारी २ ते ३ – भोजन
- दुपारी ३ ते ३.३० – संतविचारांवर आधारित कार्यक्रम
- दुपारी ३:३० ते सायंकाळी ५ – विनायक होगाडे लिखित ‘डियर तुकोबा’ पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन