वारकरी साहित्य परिषद अध्यक्ष
विठ्ठल पाटील यांच्या हस्ते पूजन
अंकली (बेळगाव) : श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या, माऊलींच्या आणि स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान अंकली (जि. बेळगाव) येथून आज सकाळी ११ वाजता (दि. ३१) झाले. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या हस्ते अश्वांचे पूजन करण्यात आले.
fantasy football trophy
nfl jerseys cheap
cheap nfl jersey
nfl shop promo code
best nfl uniforms
buffalo bills
cheap nfl football jerseys
cheap nfl jerseys
nfl football jerseys cheap
nfl shop free shipping
nfl team shop
dallas cowboys nfl
custom team jerseys
nfl shop promo code
nfl 49ers
Pittsburgh Steelers
nfl stores
nfl jerseys
buffalo bills gear
custom jersey
nfl shop coupon code
super bowl champions
nfl super bowl
cheap jerseys
nfl authentic jersey
cheap nfl jerseys
custom nfl jerseys
nfl shop steelers
nfl jersey shop
nfl shop coupon code
official nfl shop
san francisco 49ers
nfl jerseys
nfl jerseys for sale
dallas cowboys jerseys
Green Bay Packers
nfl jerseys cheap
washington nfl team
custom nfl jersey
cheap nfl jersey
nfl shop near me
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात या अश्वांना मानाचे स्थान आहे. आज निर्जला एकादशीच्या दिवशी शितोळे-अंकली (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथून सकाळी ११ वाजता हे अश्वांचे प्रस्थान झाले. हे अश्व अंकली ते आळंदी हा पायी प्रवास करून १० जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीत दाखल होतील.
या प्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार, युवराज विहानराजे शितोळे सरकार, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब अरफळकर, अजित परकाळे, निवृत्ती चव्हाण, माऊली गुळुजकर आदीसह वारकरी उपस्थित होते. पूजनानंतर नगर प्रदक्षिणा झाल्यावर या अश्वाचे आळंदीकडे प्रस्थान झाले. १८३२मध्ये श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर असा संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा सुरु झाला. तेव्हापासून अश्व आणि माऊलींचे मुक्कामाचे तंबू देण्याची श्रीमंत शितोळे सरकार यांची परंपरा आहे.
अश्वांचा प्रवास मार्ग
३१ मे रोजी मिरज, १ जून रोजी सांगलवाडी, २ जून रोजी इस्लामपूर पेठनाका, ३ जून रोजी वहागाव, ४ जून रोजी भरतगाव, ५ जून रोजी भुईंज, ६ जून रोजी सारोळा, ७ जून रोजी शिंदेवाडी, ८ आणि ९ जून रोजी पुणे आणि १० जून रोजी आळंदी असा अश्वांचा पायी प्रवास होणार असल्याचे श्रीमंत सरदार महादजीराजे शितोळे सरकार अंकलीकर यांनी सांगितले.
अश्वांची परंपरा
माऊलींच्या पालखी सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या रथापुढे जो अश्व चालत असतो तो माऊलींचा अश्व. दुसरा अश्व ज्यावर जरिपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व असतो. या अश्वांची मानाची परंपरा कर्नाटकातील अंकली येथील शितोळेराजे यांच्याकडे आहे. सध्या ही परंपरा ऊर्जितसिंहराजे शितोळे हे चालवत आहेत. हे दोन्ही अश्व सोहळ्यात सामील होण्यासाठी पायी अंकली येथून आळंदी येथे दाखल होतात.
शितोळे घराण्याचा राजाश्रय
१८३२मध्ये हैबतबाबा आरफळकर यांनी माऊलीचा पालखी सोहळा सुरू केला, तेव्हा शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. त्यानुसार शितोळे सरकारांच्या तंबूत माऊलींच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाज आरतीसाठी उपस्थिती, वारीतील न्याय निवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे असा रितीरिवाज कायम आहेत. सोहळ्यात रोज पहाटे ४ वाजता अश्वास निमंत्रण द्यायला चोपदार जातात आणि त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पादुकांजवळ येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. तिथून तो पुढे मार्गस्थ होतो.