तुकोबांचे धाकटे बंधू संत कान्होबाराय
तुकोबांचे लाडके धाकटे बंधू कान्होबा तुकोबांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक प्रसंगाचे साक्षीदार बनले. तुकोबांच्या हयातीतच घर, दुकान, सावकारकी, महाजनकी या सर्वांची जबाबदारी सांभाळू लागले. टाळकरी होऊन तुकोबांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभे राहू लागले. पंढरीला जाऊ लागले, अभंग लिहू लागले. नारायण महाराजांना त्यांनीच घडविले.