लोहगावातील टाळकरी आबाजीपंत कुलकर्णी
लोहगावात तुकोबांच्या कीर्तनाची गोडी लागलेले एक टाळकरी म्हणजे, आबाजीपंत कुलकर्णी. शिवबा कासाराच्या पत्नीप्रमाणे आबाजीपंतांच्या पत्नीलाही तिच्या पतीने तुकोबांच्या भजनी लागणे मान्य नव्हते. आजारी असलेले तिचे मूल दगावले, तेव्हा तिने ते तुकोबांच्या कीर्तनात आणून ठेवले. कीर्तनात हे मूल पुन्हा जिवंत झाल्याची कथा आहे.