कानडी सीमाभागात नाथांची परंपरा चालवणारा मठ
संत एकनाथ महाराजांचं कार्य देशभर पोहोचलं होतं. स्वत: नाथांनी देशभ्रमंती केल्याचे दाखले आहेत. त्यांचं दक्षिण भारतातही जाणं-येणं होतं. बेळगावजवळील कर्नाटक सीमेवर ‘यमकनमर्डी’ आणि ‘हत्तरगी’ या गावांच्या मध्ये श्री हरीकाका गोसावी भागवत मठ आहे. हा मठ नाथबाबांची परंपरा चालवतो. मठाचे पीठाधीश डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी त्याबाबत दिलेली ही सविस्तर माहिती.