लोहगावातील टाळकरी कोंडपाटील लोहगावकर
लोहगाव या आजोळी संत तुकाराम महाराजांना जे टाळकरी मिळाले होते, त्यातील एक होते, कोंड पाटील खांदवे. ते उत्कृष्ट टाळ वाजवत. तुकाराम महाराज त्यांच्याकडे मुक्कामाला असत, असे तुकोबांचे चरित्रकार गोपाळबुवा यांनी म्हटले आहे. लोहगावात कोंड पाटील यांच्या वंशजांना वीणा घेण्याचा अधिकार आहे.