श्रीक्षेत्र पैठणमधील संत एकनाथ षष्ठी उत्सव
पंढरपूरनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणजे, पैठणची ‘नाथ षष्ठीची यात्रा’. कठीण काळातही नाथरायांनी संतांचा विचार जागवला. मरगळलेल्या महाराष्ट्रात पुन्हा प्राण फुंकले. इथलं ऐक्य, बंधुत्व अखंड राहावं म्हणून त्यांनी आपली लेखणी, वाणी झिजवली. म्हणून तर सारा मऱ्हाटी मुलुख नाथबाबांना वंदन करण्यासाठी षष्ठीला पैठणमध्ये जमा होतो. त्यांच्या समाधीवर डोकं ठेवून ऋण व्यक्त करतो.
- ह. भ. प. अभय महाराज जगताप