संत ज्ञानेश्वर माऊली सासवडमध्ये
असतानाच सोपानकाकांचे प्रस्थान
सासवड : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज (दि. १५) सासवडमध्ये मुक्कामी असतानाच त्यांचे धाकटे बंधू संत सोपानकाका यांच्या पालखीने येथील समाधी मंदिरातून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले.
best wigs
cheap lace front wigs
best wigs for white women
best human hair wig websites
Lace Front Wigs
cheap wigs near me
wigs on sale
wig stores
best wig shops
real human hair wigs
real hair wigs for women
wigs store
human hair wigs sales
best human hair wigs
cheap human hair wigs under $50 amazon
cheap wigs
braided headband wigs
best wigs
headband wigs
wigs online
cheap wig
wigs for sale
best lace front wigs
wig stores
wig sales
glueless lace front wigs
mens wigs sale
human hair wigs
best online wig store
wig shop
long black hair wig
wigs for sale
blonde human hair wigs
wig shops
best human hair wigs online
cheap lace front wigs
wigs stores
online wig store
wig store
cheap wigs for sale
the wig shop
संत सोपानकाका समाधी मंदिरात पहाटे ४ वाजता काकड आरती, महापूजा आणि धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर पहाटे ५ पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनीही सोपानकाकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळी ११ वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरूवात झाली. परंपरेनुसार मानकरी आण्णासाहेब केंजळे आणि देवस्थानचे मुख्य विश्वस्त ह. भ. प. त्रिगुण महाराज गोसावी यांनी धार्मिक विधी केले. पाच सुवासिनींच्या हस्ते सोपानकाकांची आरती करण्यात आली. त्यानंतर श्रींच्या पादुका देऊळवाड्यातील पालखीत आणून ठेवण्यात आल्या. प्रमुख दिंड्या देऊळवाड्यात आल्यानंतर परंपरेचे अभंग झाले. यावेळी विणेकरी यांचा सन्मान करण्यात आला.
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा। हा परंपरेचा अभंग होऊन दुपारी एक वाजता संत सोपानकाकांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन देऊळवाड्याच्या उत्तर दरवाजातून पालखी बाहेर पडली. या वेळी हजारो भाविकांनी संत सोपानकाकांचा जयघोष करत फुलांची उधळण केली. भाविकांनी पालखी खांद्यावर घेऊन सासवड गावातून मिरवत जेजुरी नाक्यापर्यंत आणली.
त्याप्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविकांनी पालखी दर्शनाचा लाभ घेतला. या प्रस्थान सोहळ्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. ह. भ. प. गोपाळ महाराज गोसावी आणि ह. भ. प. त्रिगुण महाराज गोसावी यांनी खासदार सुळे यांचे स्वागत केले. यावेळी सुळे यांनी डोक्यावर विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणि तुळस घेतली. तसेच महिला वारकऱ्यांसोबत फुगडीही खेळली.
यानंतर देवस्थान आणि संत सोपानकाका बँकेचे वतीने श्री विठ्ठलाची मूर्ती आणि सोपानदेवी ग्रंथ देऊन विणेकरी, दिंडी चालकांचा सत्कार करण्यात आला. यंदा पालखी सोहळ्यात १०२ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. परकाळे यांचा एक आणि संत सोपानकाका बँकेचा एक असे पालखीपुढे दोन अश्व असून रथाला सोरटेवाडीचे केंजळे बंधूची बैलजोडी जोडण्यात आली आहे.
संत सोपानकाका पालखी सोहळ्याची ह. भ. प. अभय जगताप यांनी लिहिलेली सविस्तर माहिती-
पुरंदर तालुक्यातील पांगरे या ठिकाणी पालखीचा पहिला मुक्काम असणार आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज गोसावी आणि पंढरपूरचे धोंडोपंत दादा अत्रे यांनी १९०४ मध्ये सुरू केलेल्या पालखीचे हे ११९ वे वर्ष आहे. आजच म्हणजे ज्येष्ठ कृष्ण द्वादशीला सोपानकाकांचे थोरले बंधू संत निवृत्तिनाथ यांची पुण्यतिथी असते. याच दिवशी सासवडहून सोपानकाकांच्या पालखीचे प्रस्थान होते.
हा पालखी सोहळा पांगारे, बारामती, अकलूज, भंडीशेगाव, वाखरीमार्गे १४ दिवसांचा प्रवास करीत २८ जून रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पालखी सोहळ्यात यावर्षी १०० हून अधिक दिंड्या आणि एक लाखांहून अधिक वारकरी असणार आहेत. पालखी सोहळ्यामध्ये १८ जून सोमेश्वर नगर आणि 20 जून रोजी माळेगाव येथे गोल रिंगण होणार आहे. २६ जूनला भंडीशेगाव आणि २७ जून रोजी वाखरी येथे पादुकांजवळ उभे रिंगण होणार आहे. या पालखी सोहळ्यामध्ये प्रशासनामार्फत फिरती शौचालये, पाण्याचे टँकर, अॅम्ब्युलन्स सेवा, डॉक्टर इत्यादी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संत सोपानकाका सहकारी बँक आणि आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून पालखी रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. संस्थानाद्वारे रोज ही सजावट केली जाणार आहे.
गेल्या वर्षी संत सोपान काका पालखी सोहळ्यातील भाऊसाहेब खरवळकर दिंडी या दिंडीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचा श्रीविठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार मिळाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी आणि दिंडीप्रमुख ह. भ. प. वैभव महाराज खरवळकर यांनी स्विकारला होता. यावर्षीही पालखी सोहळ्यात स्वच्छतेवर भर देण्याचे ठरविण्यात आले आहे.
दुसरीकडे आज दिवसभर पालखीतळावर भजन, कीर्तनादी कार्यक्रम सुरू होते. सासवड पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनरांग सुमारे दोन किलोमीटरवर गेली होती. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उद्या (दि. १६) भल्या सकाळी जेजुरी मुक्कामाकडे निघणार आहे. सासवड नगरपालिका आणि ग्रामस्थांतर्फे माऊलींच्या पालखी सोहळ्याला निरोप देण्यात येणार आहे.
आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात भल्या सकाळी द्वादशीच्या परंपरेनुसार देहूकर मालकांचे सकाळी सहा ते आठ अशी कीर्तन सेवा झाली. त्यानंतर एकादशीचा उपवास सोडून सोहळा यवतकडे मार्गस्थ झाला. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोहळ्यात येऊन तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
पालखी सोहळ्यातील लोणी काळभोर ते यवत असा सर्वाधिक लांबीचा २७ किलोमीटरचा टप्पा पार करून पालखी रात्री यवत मुक्कामी विसावली. यवत गावकऱ्यांनी वारकऱ्यांना बाजरीची भाकरी, मिरचीचा ठेचा आणि पिठल्याचे जेवण दिले. उद्या (दि. १६) पालखी सोहळा दौंड तालुक्यातील वरवंड गावी मुक्कामी असणार आहे.