पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

यांनी प्रशासनाला केल्या सूचना

पंढरपूर : यंदाचा तीव्र उन्हाळा लक्षात घेऊन वारकऱ्यांचे उष्म्यापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी, तसेच महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन स्वच्छता गृहे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (दि. ९) केल्या.
air jordan 1 low
nike air jordan 4 oil green
best jordan 4
nike air jordan 4 black canvas
nike air jordan 1
jordan for sale
jordan shoes online
best jordan shoes
nike air jordan women
nike air jordan 1 retro high og
nike air jordan mid 1
jordan shoes online
jordan 4 red thunder
air jordan 1
off white jordan 1
nike air jordan red and black
best jordan 4
jordan 1 sale
jordan 1 for sale
nike air jordan 11 midnight navy
nike air jordan 1 retro high
nike air jordan high tops
jordan shoes for men
jordan 4 black cat
nike air jordan shoes
nike air jordan low
nike air jordan 4 retro trainers
mens nike air jordan
jordan outlet
nike air jordan 4
jordan for sale
nike air jordan mid
best jordan 1
air jordan sale
sales of air jordan
nike air jordan 11
nike air jordan 4 black
nike air jordan mid
cheapest jordan 4
nike air jordan mens basketball shoes
nike air max 90 mens on sale

आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी पालखीतळ तसेच मार्गावर प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची विखे पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पालखी मार्ग आणि तळवरील त्रुटीची पूर्तता तातडीने करावी, अशा सूचना संबंधितांना केल्या.

सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते, माळशिरस, वेळापूर, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी पालखीतळ तसेच पुरंदावडे येथील रिंगण व्यवस्थेची पाहणी विखे पाटील यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, राम सातपुते आणि जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे, विश्वस्त श्री. देसाई, सुधीर पिंपळे, प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी नामदेव टिळेकर आणि गजानन गुरव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता लक्षात घेवून आपत्कालीन कक्षांची संख्या वाढवावी. पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा कक्ष उभारावेत. या कक्षांमध्ये वारकऱ्यांसाठी ओआरएसची पाकिटे, स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, मोबाईल टॉयलेट्स, इमर्जन्सी मेडिकल युनिट इत्यादी गोष्टींची व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर पालखी तळावर आणि मार्गावर वारकरी भाविकांना आरोग्यविषयक सेवा तत्काळ उपलब्ध होण्यासाठी सर्व सुविधायुक्त फिरत्या दवाखान्यांची तसेच मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी.

विखे पाटील पुढे म्हणाले, नातेपुते येथील पालखी तळासाठी जागा अपुरी पडत असल्याने पालखी तळालगत असलेली जागा उपलब्ध करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. महावितरण विभागाने पालखी तळ आणि मार्गावरील धोकादायक वीज वाहक तार, खांब तसेच रोहित्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावीत. आवश्यकतेनुसार विद्युत व्यवस्थेसाठी मोबाईल जनरेटरची व्यवस्था करावी. वेळापूर पालखी तळावर प्रखर प्रकाशासाठी अधिकच्या हायमास्टची व्यवस्था करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

पिराची कुरोली पालखी तळाची स्थानिक यंत्रणा कामाला लावून तात्काळ स्वच्छता करून घ्यावी. तसेच राष्ट्रीय महामार्गापासून पालखी तळापर्यंत येणाऱ्या रस्त्याच्या साईट पट्ट्या तात्काळ भरून घ्याव्यात. महिला वारकऱ्यांसाठी पालखी तळावर तंबूंची व्यवस्था करण्यात यावी. पालखी मार्गावर आणि पालखी तळावर पाण्याची मुबलक व्यवस्था व्हावी, यासाठी दूध संघाच्या टँकर्सची उपलब्धता करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करावीत, अशा सूचनाही विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *